चीनमधून बाहेर पडणा-या कंपन्यांचा भारताकडे कल
२४ कंपन्या भारतात मोबाईल फोनची निर्मिती करण्यास विचार
नवीदिल्ली/दि. १८ – चीनमधून बाहेर पडणारयाकंपन्यांना आकर्षित करण्यासाठी भारत नव्या प्रोत्साहन आराखड्यावर काम करत आहे. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सपासून अॅपलपर्यंतच्या जवळपास २४ कंपन्या भारतात मोबाईल फोनची निर्मिती करण्यावर विचार करीत आहेत. भारत सरकारने मार्चमध्ये काही क्षेत्रासाठी नव्या प्रोत्साहन आराखड्याची घोषणा केली होती. इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंगसाठी येत्या पाच वर्षांपर्यंत त्यांच्या इन्क्रिमेंटल सेल्ससाठी चार ते सहा टक्के रक्कम प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे दोन डझनापेक्षा जास्त कंपन्या मोबाइल फोन श्रेणीत ११ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास तयार आहेत. सॅमसंगशिवाय फॉक्सकॉन, विस्ट्रॉन कॉर्प आणि पेनाट्रॉन कॉर्पसारख्या मोठ्या कंपन्याही रस दाखवत आहेत. भारताने याच पद्धतीची प्रोत्साहन अनुदान योजना औषधध उद्योगासाठी जाहीर केली आहे. यासोबत अनेक क्षेत्रासाठी याच पद्धतीच्या प्रोत्साहन आणि अन्य सुविधा देण्याची याोजना आहे. वाहन, वस्त्रोद्योग आणि अन्न प्रक्रिया उद्योगाला केंद्र सरकारने प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. अमेरिका-चीन व्यापार युद्ध आणि कोरोना विषाणू संकटामुळे खूप कंपन्या आपल्या पुरवठा साखळीला चीनशिवाय अन्य दुसरया देशांत शिफ्ट करण्यासाठी गंभीर प्रयत्न करत आहेत; मात्र भारताला त्याचा खूप खूप फायदा मिळाला नाही. ‘स्टँडर्ड चार्टर‘ने नुकत्याच केलेल्या पाहणीत चीनमधून बाहेर निघणारया कंपन्यांचा सर्वांत जास्त फायदा व्हिएतनामला झाला आहे. क्रेडिट सुइसच्या एका अहवालानुसार, सरकारद्वारे जाहीर प्रोत्साहन येत्या ५ वर्षांत चार लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक देशात आणण्यात मदत करू शकते. ही गुंतवणूक भारताच्या आर्थिक उत्पादनात अर्धा टक्क्याची भर घालील. पाच वर्षांत जागतिक स्मार्टफोन उत्पादनाचा दहा टक्के हिस्सा भारतात स्थलांतरित होऊ शकतो.
सॅमसंगचे तीन लाख कोटीं स्मार्टफोन
सॅमसंगची तीन लाख कोटी रुपये किमतीचे स्मार्टफोन भारतात तयार करण्याची योजना आहे. सॅमसंग व्हिएतनाम आणि अन्य दुसरया देशांतून आपल्या उत्पादनाचा मोठा हिस्सा भारतात शिफ्ट करू शकते; मात्र कंपनीने या मुद्द्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.