मराठी

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान रामगिरी बंगल्यात निघाला धामण सांप

सर्पमित्राने सापांला पकडून ट्रॉन्झिट सेंटरडे सोपविले

नागपूर/दि.११- मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या येथील रामगिरी बंगल्यात मंगळवारी साप निघाला. हा साप बिनविषारी धामण जातीचा होता. सर्पमित्राला पाचारण केल्यावर त्याला पकडून ट्रॉन्झिट सेंटरकडे सोपविण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वायरलेस रुममध्ये हा साप असल्याचे दुपारी पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पोलिसांच्या रायफलला गुंडाळून तो बसला होता. पोलिसांनी सर्पमित्र शुभम पराळे यांना या संदर्भात माहिती दिल्यावर त्यांनी पोहचून सापाला पकडले. पलंगाखाली असलेल्या पोलिसांच्या रायफलला वेटोळे घालून तो बसला होता. सुमारे सात फूट लांबीचा हा साप होता. पराळे यांनी सुखरूपपणे रेस्क्यू करून त्याला ताब्यात घेतले. नंतर वन विभागाच्या सेमिनरी हिल्स ट्रान्झिट सेंटरमध्ये पंचनामा करून वनविभागाच्या स्वाधीन केले. वैद्यकीय तपासणीनंतर सापाला निसर्गमुक्त केले जाणार आहे.

Related Articles

Back to top button