मराठी

डॉन दाऊद इब्राहीम पाकिस्तानमध्येच लपून बसला

पाकिस्तानने प्रथमच दिली कबूली

इस्लामाबाद/दि.२२- दहशतवादाच्या मुद्द्यावरून(Terrorism) सध्या पाकिस्तानची चहुबाजूनी कोंडी झालेली आहे. भारताविरोधात कारवाया करण्यासाठी पाकिस्तानदहशतवाद पोसत असल्याचे सातत्याने समोर येऊ लागल्याने पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या अडचणी वाढल्या असून, एफएटीएफचे निर्बंध टाळण्यासाठी पाकिस्तानचा आटापिटा सुरू आहे. दरम्यान, 1993 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील (In the 1993 Mumbai terror attacks)मुख्य आरोपी असलेला कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम(dawood Ibrahim) हा पाकिस्तानमध्येच लपून बसला असल्याची जाहीर कबुली पाकिस्तानने प्रथमच दिली आहे.
दहशतवाद्यांना होणारा वित्तपुरवठा रोखण्यासाठी देखरेख ठेवून असणाऱ्या एफएटीएफ या संस्थेच्या कारवाईची टांगती तलवार पाकिस्तावर आहे. त्यामुळे या कारवाईपासून वाचण्यासाठी पाकिस्तानने 88 दहशतवादी संघटना आणि हाफिझ सईद, मसूद अझहर आमि दाऊद इब्राहिमसह अन्य काही बड्या दहशतवाद्यांवर कारवाईचा बडगा उगारत कठोर आर्थिक निर्बंध लादले आहेत. तसेच पाकिस्तान गेली अनेक वर्षे दाऊद इब्राहिम हा आपल्याकडे असल्याची बाब सातत्याने नाकारत होता. मात्र आज पहिल्यांदाच पाकिस्तानने दाऊद(dawood Ibrahim) हा आपल्या देशात लपून बसला असल्याचे खुलेपणाने मान्य केले आहे.

Related Articles

Back to top button