मराठी

शेतक-यांनो घाबरू नका, भिजलेल्या सोयाबीनचा मिळेल विमा

खासदार भावनाताई गवळी यांचे आवाहन

यवतमाळ/दि.१३ –  शेतात काढून ठेवलेले सोयबिन पावसामुळे भिजले असेल व शेतकऱ्यांनीत्याचा विमा काढला असेल त्याची नुकसान भरपाई नक्कीच मिळेल. त्यामुळे शेतकरी बांधवांनी घाबरून न जाता विमा कंपनी किंवा कृषीविभागाशी संपर्क साधावा असे आवाहन खासदार भावनाताई गवळी यांनीकेले आहे.
मागील दोन दिवसापासून यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वदूर पाऊस होतआहे. सध्या सोयाबीनची काढणी अंतिम टप्प्यात आहे. काही शेतकऱ्यांनीसोयाबीन काढून गोळा न करता शेतात वाळवण्यासाठी तसेच ठेवलेलेआहे. दोन दिवसात झालेल्या पावसामुळे सदरचे सोयाबीन भिजलेअसल्यास ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन चा विमा उतरविला आहे त्याशेतकऱ्यांना नुकसान झाले असल्यास काढणी पश्चात नुकसान भरपाई यासदराखाली पिक विमा मिळू शकतो. यासाठी पीक विम्यासाठी सोयाबीनअधिसूचित क्षेत्रातील शेतात सोयाबीन कापणी करून सुकवण्यासाठीपसरून ठेवलेल्या ठिकाणी कापणीपासून 14 दिवसात गारपीट,चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे पडलेला पाऊस व अवकाळी पावसामुळेझालेले नुकसान वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसानीस ग्राह्य धरतायेतात. यासाठी शेतकऱ्यांनी सदरची घटना घडल्यापासून 72 तासाच्याआत याबाबतची सूचना विमा कंपनी व कृषी विभागास देणे बंधनकारकआहे. यामध्ये नुकसान कळवितांना सर्वे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्रतपशील कळविणे  बंधनकारक आहे. प्राप्त झालेल्या सुचनेनंतर संयुक्तसमिती शेतकऱ्याच्या नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी करेल. या मध्येविमा कंपनी प्रतिनिधी, कृषि अधिकारी व संबंधित शेतकरी यांचा समावेशअसेल. पाहणीनंतर नुकसानीचा अहवाल 10 दिवसात सादर करण्यातयेईल. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांनीगूगल प्ले स्टोअर वरून क्रॉप इन्शुरन्स हे एप डाऊनलोड करून त्यामध्येआपल्या नुकसानीची माहिती द्यावी किंवा 18001024088 /180030024088 या टोल फ्री क्रमांकावर किंवा [email protected] या ई-मेल वर किंवा कृषि विभागाच्याकार्यालयात अर्ज करून कळवावे.  असे आवाहन खासदार भावनाताईगवळी यांनी केले आहे.

 सरकार शेतक-यांच्या पाठीशी

प्रधानमंत्री पिक विमा योजनेकरीता राज्याचा विमा हफ्ता 496.14 कोटी देय होता. राज्यातील उध्दव सरकारने विमा कंपन्यांना देय असलेली पिक विमा हप्ता अनुदानाची रक्कम वितरीत करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे शेतक-यांनी कुठलीच भिती न बाळगता झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा. राज्यातील उध्दवजी ठाकरे यांचे सरकार शेतक-यांच्या पाठीशी असल्याने शेतक-यांना चिंता करण्याची गरज नाही. – भावनाताई गवळी,खासदार यवतमाळ-वाशिम

Back to top button