मराठी

चार विद्यार्थ्‍यांचे एस.एस.सी. (जी.डी.) मधील घवघवीत यश

अमरावती महानगरपालिकेने विद्यार्थ्‍यांचे केले सन्‍मान

अमरावती/दि. २८ –  स्‍वप्‍ने सांगायची नसतात,  ती खरी करुन दाखवायची असतात, ती स्‍वप्‍ने प्रत्‍येकक्षात उतरवणारे अमरावती महानगरपालिकेच्‍या स्‍पर्धा परिक्षा अभ्‍यासिकेतील चार विद्यार्थ्‍यांची एस.एस.सी. (जी.डी.) मार्फेत शासन सेवेत निवड झाली आहे. परिक्षा केंद्र सुरु झाल्‍यानंतर महानगरपालिकेतील प्रचंड प्रतिसाद मिळत असुन शहरासह अन्‍य जिल्‍ह्यातुन अमरावतीत शिक्षणाकरीता येणा-या विद्यार्थ्‍यांना यांचा लाभ मिळत आहे.
मनपाच्‍या महिला व बालविकास विभागाकडुन आयुक्‍त बंगल्‍याच्‍या मागे 10 वर्षापूर्वी स्‍पर्धा परिक्षा ग्रंथालय व अभ्‍यासिका केंद्र सुरु करण्‍यात आले. मनपाच्‍या या नाविण्‍यपुर्ण स्‍पर्धा परिक्षा अभ्‍यासिकेमध्‍ये सागर माकोडे, पवन वानखेडे, रुपेश मोहोकार, प्रियंका रिठे यांची एस.एस.सी. (जी.डी.) मध्‍ये विविध पदी निवड झाली आहे. या विद्यार्थ्‍यांनी कर्मचारी चयन आयोग (एस.एस.सी. (जी.डी.) माध्‍यमातुन घेण्‍यात आलेल्‍या भरतीत घवघवीत यश मिळवले. सहाय्यक आयुक्‍त नरेंद्र वानखडे यांनी पुढाकार घेवून काही वर्षापुर्वी स्‍पर्धा परिक्षा क्षेत्रात करीअर करु इच्‍छीना-या विद्यार्थ्‍यांसाठी अभ्‍यासिकेची उभारणी केली. त्‍यानंतर हा महाराष्‍ट्रातील नाविण्‍यपुर्ण उपक्रम ठरला गेला या उपक्रमा मार्फेत शेकडो विद्यार्थी शासकीय सेवेत विविध पदांवर रुजु झाले.
केंद्रातील विविध सुविधा व नियोजन बघुन अमरावती शहरातील अनेक विद्यार्थ्‍यांचे अभ्‍यास करण्‍याचा त्‍यांचा कला व मनोबल अभ्‍यासिकाकडे दिवसेंदिवस वाढत आहे. यश प्राप्‍त केलेल्‍या विद्यार्थ्‍यांचे मनपा आयुक्‍त मा.श्री.प्रशांत रोडे यांनी रोप देवून कौतुक व सत्‍कार केला. तसेच उपस्थित सहाय्यक आयुक्‍त नरेंद्र वानखडे यांनी सुध्‍दा विद्यार्थ्‍यांचे कौतुक केले, या यशामुळे केंद्रावरील विद्यार्थ्‍यांना प्रेरणा मिळेल व अधिकाअधिक यश मिळेल. अश्‍या शुभकामना व्‍यक्‍त केल्‍या.
यावेळी उपआयुक्‍त सुरेश पाटील, अमित डेंगरे, मुख्‍यलेखाधिकारी हेमंत ठाकरे, सहाय्यक आयुक्‍त नरेंद्र वानखडे उपस्थित होते.

Related Articles

Back to top button