मराठीमुख्य समाचार

अँटीजेन टेस्टनुसार अठरा रूग्ण आढळले

आज आढळलेल्या रूग्णांची संख्या 68

अमरावती, दि. 6 : अँटीजेन टेस्टनुसार जिल्ह्यात 18 नवे रूग्ण आढळले आहेत. त्यानुसार आज आढळलेल्या रूग्णांची संख्या 68 झाली आहे. जिल्ह्यात अद्यापपर्यंत आढळलेल्या रूग्णांची संख्या 2 हजार 740 झाली आहे.

अँटीजेन टेस्टनुसार प्राप्त अहवालात, अमरावती शहरातील बापटवाडी येथील 40 वर्षीय पुरूष, शंकरनगर येथील 36 वर्षीय महिला, 14 वर्षीय बालक, 40 वर्षीय महिला, 17 वर्षीय पुरूष, 13 वर्षीय बालिका, तसेच, मसानगंज येथील 32 वर्षीय पुरूष यांचा समावेश आहे.

त्याचप्रमाणे, अंजनगाव सुर्जी येथील 48 वर्षीय व 34 वर्षीय अशा दोन महिलांचा समावेश आहे. पथ्रोट येथील 22 वर्षीय महिला, मलकापूर धामोरी येथील 43 वर्षीय महिला, 72 वर्षीय महिला, 21 वर्षीय महिला, 43 वर्षीय महिला व 80 वर्षीय पुरूष अशा पाचजणांचा समावेश आहे. धामणगाव रेल्वे येथील दत्तापुर पेट्रोल पंपजवळील 50 वर्षीय व 30 वर्षीय अशा दोन महिलांचा समावेश आहे. तिवसा तालुक्यातील व-हा येथील 19 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

Back to top button