अमरावतीमराठी

शेतकऱ्यांनी बगाजी सागर धरणातच जलसमाधी घेण्याचा इशारा

अमरावती/दि.४ – निम्नवर्धा प्रकल्प कार्यालयाने चुकीच्या ठिकाणी पूल बांधल्यामुळे सात वर्षांपासून शेतात पाणी साचत असल्याने वरूड बगाजी येथील शेतकऱ्यांनी बगाजी सागर धरणातच जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे.
वरूड बगाजी येथील 10 ते 12 शेतकऱ्यांची 20 ते 25 एकर जमीन येरली शिवारात येते. निम्नवर्धा प्रकल्पाने सन 2013 मध्ये येथे पुलाचे बांधकाम करताना उतार भाग सोडून टेकडीवर पूल बांधला. त्यामुळे या पुलातून पाणी न जाता या भागातील शेतकऱ्यांच्या शेतात दरवर्षी पावसाचे पाणी साचत आहे. दरवर्षी येथील शेतकरी आशेने पेरणी करतात. मात्र पाण्यामुळे उगविलेले पीक सडते. बांधलेल्या पुलावर आजपर्यंत अनेक वेळा खर्च करून बिल काढण्यात आले. मात्र पुलाची अवस्था अद्यापही जैसे थे आहे. याच भागात काही शेतकऱ्यांनी नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडवल्यामुळे अन्य शेतीचे नुकसान होत आहे. या तक्रारीची दखल विभागीय आयुक्तांनी घेतली. मात्र निम्नवर्धा प्रकल्पाने आदेशाची अंमलबजावणी केली नसल्याने शेतकऱ्यांनी बगाजी सागर धरणात जलसमाधी घेण्याचा इशारा ओंकार काष्टे, चंद्रशेखर भनारकर, नामदेव काष्टे, एकनाथ काष्टे, रामाजी पचाकरे, रामदास पचारे, अरविंद धोटे, कैलाश मोहनकर, सदाशिव पचारे, विनोद झोपाटे, उमेश म्हात्रे यांनी दिला.

Related Articles

Back to top button