मराठी

जम्मू-काश्मीरमध्ये फोर जी सेवा सुरू करणार

१५ ऑगस्टपासून जम्मू-काश्मीरच्या काही भागात फोर जी

जम्मू-काश्मीर दि. ११ – जम्मू-काश्मीरमध्ये फोर जी इंटरनेट सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या वेळी सांगितले. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्टपासून जम्मू-काश्मीरच्या काही भागात फोर जी इंटरनेट सेवा बहाल करण्यात येणार आहे. जम्मू-काश्मीरमधील एका-एका जिल्ह्यात चाचणी फोर जी इंटरनेट सेवा बहाल होईल. त्यानंतर पुढील २ महिन्यांत याचा आढावा घेतला जाईल. प्रत्यक्ष सीमारेषेजवळ मात्र ही सेवा सुरू होणार नाही.

Related Articles

Back to top button