मराठी
घोडदेव सिंचन प्रकल्प ठरणार शेतकऱ्यांसाठी वरदान
आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते घोडदेव सिंचन प्रकल्पाचे जलपूजन
-
१० वर्षांपासून रखडलेले कालव्याचे काम पूर्णत्वास जाणार
-
आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना बंदिस्त पाईप लाईन द्वारे पाणी मिळणार
मोर्शी दी ३– मोर्शी तालुक्याला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत असतांना घोडदेव सिंचन प्रकल्प तयार करण्यात आला त्यामुळे मोर्शी तालुक्यातील घोडदेव, डोंगर यावली, हिवरखेड, येथील हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला व त्यापासून या भागामध्ये कोट्यावधी रुपयांची उलाढाल सुरू झाली व घोडदेव दापोरी हिवरखेड हा भाग विक्रमी संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध झाला. संत्रा उत्पादकांसाठी वरदान ठरणाऱ्या घोडदेव सिंचन प्रकल्पाचे जलपूजन मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले.
मोर्शी पासून अवघ्या पंधरा किलोमिटर अंतरावर असलेल्या घोडदेव सिंचन प्रकल्प वनराईने नटलेला असून या प्रकल्पाच्या चारही बाजूने पहाड्या आहेत.या प्रकल्पात दरवर्षीच मोठय़ा प्रमाणात पाणी जमा होते. मोर्शी तालुक्यातील शेकडो हेक्टर शेतीला सिंचनाची सोय करणारे लहान मोठे प्रकल्प माजी कृषी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर होऊन मागील १० वर्षांपासून लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षितपणामुळे आजही ते अपूर्णावस्थेत आहेत. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा घोडदेव तलाव तुडूंब भरला असून जलसाठा मोठय़ा प्रमाणात आहे. मात्र या प्रकल्पाचे कालवे तयार नसल्याने हे पाणी सिंचनासाठी उपयोगातच आणता येत नाही. त्यामुळे शेतकर्यांची सिंचनाची स्थिती असून नसल्यासारखी आहे .मोर्शी तालुक्यात घोगरा नदीवरील घोडदेव सिंचन प्रकल्पाचे काम मागील १० वर्षापासून पूर्ण झाले असून या प्रकल्पावर कोट्यवधी रुपये खर्च झाले असून कालव्याचे काम थंड बसत्यात पडले आहे .
घोडदेव सिंचन प्रकल्पाकरिता ७१.४२ हेक्टर जमीन संपादित केली असून १७६८ सघमी पाणि साठा असून २१६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे या प्रकल्पाचा दापोरी, डोंगर यावली, हिवरखेड, येथील शेकडो शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. या कालव्याच्या माध्यमातून या प्रकल्पाचे पाणी शेतात जाणार आहे ते कालवेच अपूर्ण आहेत. या गंभीर प्रकारची दखल आमदार देवेंद्र भुयार यांनी घेतली असून ३ किलोमीटर लांबीचा कालव्याकरिता बंदिस्त पाईप लाईन द्वारे शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याकरिता शासनाकडे १८०१.७९ लक्ष रुपयांचे सुधारित अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यतेकरिता वित्त विभागाकडे पाठविले असल्याची माहिती आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली मोर्शी वरुड तालुक्यातील अपूर्ण असेलेले सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेऊन मोर्शी वरुड तालुका दुष्काळमुक्त करून सुजलाम सुफलाम करणार असल्याची ग्वाही आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली.
घोडदेव येथे आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते घोडदेव येथील सिंचन प्रकल्पाचे जलपूजन करण्यात आले त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष नरेंद्र जिचकार, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रकाश विघे, उमेश गुडधे, डॉ प्रदीप कुऱ्हाडे, मोहन मडघे, सुनील केचे, स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष हितेश साबळे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, निखिल फलके, पिंटू विधळे, अमोल महल्ले, धनंजय अमदरे, सिंचन विभागाचे ठाकरे साहेब, आहाके साहेब यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते .