मराठी

‘गूगल‘ ने युझर्ससाठी आणली आभासी कार्ड बनविण्याची सुविधा

सोशल मीडिया हँडल आणि इतर माहिती सामायिक करण्यास सक्षम असतील

मुंबई दि. ११ – ‘गूगल‘ ने एक विशेष सेवा सुरू केली आहे. या कंपनीने भारतीय वापरकत्र्यांसाठी खास पीपल कार्ड सुरू केले आहेत. या वैशिष्ट्याच्या मदतीने ‘गूगल‘ मध्ये शोध घेऊन वापरकर्ते आभासी व्हिजिटिंग कार्ड तयार करू शकतील. ‘गूगल‘च्या मदतीने सर्चमध्ये जाऊन कोणत्याही व्यक्तीला शोधू शकता किंवा कोणतीही व्यक्ती तुम्हाला शोधू शकते. त्यामध्ये, आपल्याबद्दल समान माहिती जगासाठी दृश्यमान असेल. वापरकर्ते ‘गूगल‘ शोधमध्ये त्यांची वेबसाइट, सोशल मीडिया हँडल आणि इतर माहिती सामायिक करण्यास सक्षम असतील. ‘गूगल‘ अकांऊट असेल, तर कोणीही पीपल कार्ड तयार करू शकते. ही सेवा वापरकत्र्याद्वारे ‘गूगल‘चे नॉलेज ग्राफ वापरून दिलेली माहिती दर्शविते. यासाठी वापरकत्र्याला मोबाईल नंबर द्यावा लागेल. आपले सार्वजनिक प्रोफाइल तयार करण्यासाठी आपल्या मोबाइल डिव्हाइसवरून ‘गूगल‘ खात्यावर लॉग इन करावे लागेल.

‘गूगल‘ ने भारताची लोकसंख्या पाहता अनेक वैशिष्ट्ये जोडली आहेत. कोणतीही व्यक्ती केवळ एकच कार्ड बनवू शकते. हे कार्ड तपासणीनंतरच दिले जाईल. जर एखाद्या वापरकत्र्यास हे कार्ड कायमचे बंद करायचे असेल तर तो ते बंद करू शकेल. हे कार्ड तयार करण्यासाठी फोटो, व्यवसाय, स्थान तपशील द्यावा लागेल. जेणेकरून ते समान नावाच्या इतर कार्डांपेक्षा वेगळे केले जाऊ शकते. जर वापरकत्र्यास हवा असेल तर हे कार्ड शिक्षण, संपर्क, गाव आणि ‘सोशल मीडिया‘ प्रोफाइल यासारखी माहितीदेखील जोडेल. वापरकत्र्याचे त्याच्या कार्डावर पूर्ण नियंत्रण असेल, जेव्हा जेव्हा त्याला पाहिजे तेव्हा आपली माहिती डिलीट करून अद्ययावत करू शकतो.

Related Articles

Back to top button