करप्रणालीत वाढणार निष्पक्षताः सीतारामण
पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचा हेतू करदात्यांना सक्षम बनविणे
नवी दिल्ली दि.१३ – ‘फेसलेस‘ मूल्यांकन आणि अपील केल्यास करदात्यांकडील तक्रारींचे ओझे कमी होईल आणि करप्रणालीत निष्पक्षता वाढेल, असे मत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या, की कर प्रशासनाच्या इतिहासातील आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचा हेतू करदात्यांना सक्षम बनविणे, पारदर्शक यंत्रणा निर्माण करणे आणि प्रामाणिक करदात्यांचा सन्मान करणे, हा आहे. मोदी यांचे हे उद्दीष्ट साकार करण्यासाठी प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी)ने एक मसुदा तयार केला आहे आणि एक व्यासपीठ म्हणून एक नवीन यंत्रणा लागू केली गेली आहे. त्यामुळे कर प्रशासन पारदर्शक, कार्यक्षम आणि जबाबदार बनविण्यात आले आहे. या व्यासपीठामुळे करदात्यांच्या तक्रारींचे ओझे कमी होते आणि कामकाज सोपे होते. प्राप्तिकर विभागाने अनेक सुधारणा केल्या असून यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग युनिटसाठी कॉर्पोरेट कर दर ३० टक्क्यांवरून २२ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.