मराठी

भारत आर्थिक सुधारणांच्या जवळ

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांचे मत

नवी दिल्ली/दि.२२  – भारत आर्थिक सुधारणांच्या अगदी जवळ आहे. वित्तीय संस्थांकडे पुरेसे भांडवल असणे फार महत्वाचे आहे, असे मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी व्यक्त केले.
वित्त आयोगाचे अध्यक्ष एनके सिंह यांनी लिहिलेल्या ‘पोर्ट्रेट्स ऑफ पावरः हाफ सेंचुरी ऑफ बिंग अ‍ॅट रिंगसाइड’ च्या प्रकाशन कार्यक्रमात दास बोलत होते. ते म्हणाले, की आम्ही जवळजवळ आर्थिक पुनरुज्जीवन केले आहे. अशा परिस्थितीत, वित्तीय संस्थांना वाढीस आधार देण्यासाठी पुरेसे भांडवल असणे फार महत्वाचे आहे. दास यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी स्वत: बँक आणि एनबीएफसी यांच्याबरोबर पुरेसे भांडवल जमा करण्यासाठी बैठक घेतली आहे. यातील ब-याच युनिट्सनी भांडवल उभारले आहे आणि येत्या काही महिन्यांत पुष्कळ भांडवल उभे करतील. यात सरकारी आणि खासगी अशा दोन्ही क्षेत्रातील घटकांचा समावेश आहे.
दास म्हणाले, की कोरोनानंतरच्या आव्हानांची पूर्ती करण्यासाठी भारताला वित्तीय वाढीचा मार्ग निवडावा लागेल. या संकटानंतर सरकारला आर्थिक एकत्रीकरणासाठी स्पष्ट आराखडा तयार करावा लागेल. आम्ही आर्थिक आणि वित्तीय दोन्ही धोरणांवर उदारमतवादी विचार केला आहे.
समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक मदत देण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. याशिवाय उद्योग व व्यवसायांनाही दिलासा मिळाला आहे. कोरोनाचे संकट संपल्यानंतर बँका आणि एनबीएफसीवरील दबावाचे विश्लेषण केले जाईल.

Related Articles

Back to top button