भारताला अमेरिकेकडून मिळणार ड्रोन
वॉशिंगटन :- अमेरिकेकडून भारताला विक्री करण्यात येणाऱ्या शस्त्रांमध्ये सशस्त्र ड्रोनचा समावेश आहे. लडाखमध्ये भारत-चीनमध्ये लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर झालेल्या qहसक संघर्षानंतर ही शस्त्र विक्री-खरेदी महत्त्वपूर्ण समजली जात आहे. भारत-चीन सीमावादाच्या पाश्र्वभूमीवर अमेरिका भारताला शस्त्र विक्री वाढवण्याचा विचार करीत आहे. भारताला नवीन शस्त्र विक्री करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. यामध्ये सशस्त्र ड्रोनसारख्या उच्चस्तरीय शस्त्र प्रणाली तंत्रज्ञान असणार आहे. भारताला सैन्य स्तरावर ड्रोन विक्री करता येऊ शकेल, यासाठी अमेरिकेने आपल्या नियमात सुधारणा केली आहे. जुन्या नियमांनुसार भारताला सशस्त्र ड्रोन विक्री करता येऊ शकत नव्हती. या वृत्तानुसार, अमेरिकेला या नियम सुधारणामुळे भारताला सशस्त्र ड्रोन विक्री करण्याचा निर्णय घेता येणार आहे. एका अधिकार्याने सांगितले, की भारताला सशस्त्र(श्रेणी-१) प्रीडेटर्स देण्यात येणार आहे. ‘एमक्यू-१ प्रीडेटर ड्रोन‘ हे सशस्त्र ड्रोन आहे. या ड्रोनद्वारे एक हजार पौंड वजनाचे बॉम्ब, क्षेपणास्त्र डागता येऊ शकतात. भारत आणि अमेरिकेतील संरक्षण खरेदी २००८ मध्ये नगण्य स्तरावर होती; मात्र या वर्षी शस्त्र खरेदी मोठ्या प्रमाणावर वाढली असून २० अब्ज डॉलर क़ीमतीचे शस्त्र भारताने अमेरिकेकडून खरेदी केले आहेत. यामध्ये एमएच-६०आर सीहॉक हेलिकॉप्टर (२.८ अब्ज डॉलर). अॅपाचे हेलिकॉप्टर (७९६ दशलक्ष डॉलर) आदी करारांचा समावेश आहे. अमेरिकेने २०१६ मध्ये भारताला संरक्षण क्षेत्रातील महत्त्वाचा भागीदार म्हणून दर्जा दिला.