मराठी

मनपा लेखापरिक्षण पथकाद्वारे कोविड-19 खाजगी रुग्‍णालयाची तपासणी  

अमरावती प्रतिनिधी दि २५- आज दिनांक 25 फेब्रुवारी,2021 रोजी दुपारी 3.00 वाजता महानगरपालिका लेखापरिक्षण पथक प्रमुख तथा मुख्‍यलेखापरिक्षक डॉ.हेमंत ठाकरे यांच्‍या नेतृत्‍वात महाविर हॉ‍स्‍पीटल येथे मा.आयुक्‍त यांच्‍या निर्देशानुसार आकस्मिक भेट देण्‍यात आली. यावेळी सदरचे रुग्‍णालयात एकुण 34 रुग्‍ण भर्ती असल्‍याबाबत तेथील व्‍यवस्‍थापकांनी माहिती दिली. महाविर हॉस्‍पीटल ची पाहणी केली असता त्‍यांना एका वार्डमध्‍ये रुग्‍णांची संख्‍या मर्यादीत ठेवण्‍याबाबत निर्देश देण्‍यात आले. हॉस्‍पीटलचे दर्शनी भागात अधिसुचनेप्रमाणे दराचे फलक लावण्‍यात न आल्‍याने त्‍यांना तात्‍काळ फलक लावण्‍याबाबत निर्देश दिले. तसेच शासन अधिसुचनेमधील परिशिष्‍ट C प्रमाणे प्रत्‍येक रुग्‍णाकडुन शुल्‍क आकारण्‍याबाबत निर्देश देण्‍यात आले.
आज दिनांक 25 फेब्रुवारी,2021 रोजी सायंकाळी 5.00 वाजता मुख्‍यलेखपरिक्षक डॉ.हेमंत ठाकरे यांनी अॅक्‍झॉन हॉस्‍पीटल ची पाहणी केली. शासनाच्‍या अधिसुचना Corana-2020/CR-97/ARO-5, दिनांक 21/05/2020 व दिनांक 31/08/2020 अन्‍वये कोविड-19 रुग्‍णालयाकडुन रुग्‍णास आकारण्‍यात येणा-या शुल्‍क आकारण्‍या संबंधीत निर्देश देण्‍यात आले आहे. तसेच रुग्‍णालयाच्‍या दर्शनी भागात सदर शुल्‍काची माहिती लावण्‍यास आली होती. यावेळी रुग्‍णालयातील वार्ड, आय.सी.यु., बेड ची पाहणी करण्‍यात आली.
पाहणी दरम्‍यान परिपत्रक क्र.अमनपा/मुलेप/226/2021, दिनांक 25/02/2021 रोजीचे रुग्‍णालयात देण्‍यात येवून अतिरिक्‍त शुल्‍क आकारल्‍यास कारवाई करण्‍यात येईल असे निर्देश देण्‍यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी (स्‍वच्‍छता) डॉ.सिमा नेताम, वरीष्‍ठ लिपिक गुलशन मिरानी, कनिष्‍ठ लिपिक विशाल पिंपळे उपस्थित होते.

Related Articles

Back to top button