मराठी

जेईई व नीट या परीक्षा स्थगित करा

विक्रम ठाकरे यांंचे नेतृत्वात जिल्हाधिकारयांना निवेदन

वरुड/दि.२८ – सद्य:स्थिती लक्षात घेता महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशात कोरोना चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतच आहे. कोरोनामुळे सर्व परीक्षा स्थगित किंवा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जेईई व नीटची प्रवेशपरीक्षाही स्थगित करण्यात यावी, अशी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव तथा पंचायत समिती सभापती विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात मोर्शी विधानसभा युवक काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी, अमरावती यांना तहसिलदार वरुड यांचे मार्फत निवेदनाद्वारे करण्यात आली.
विद्यार्थी व पालकांचे आरोग्य हित लक्षात घेता कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यावर जेईई व नीटची प्रवेशपरीक्षा घेण्यात याव्या, तोवर जेईई व नीट या प्रवेशपरीक्षा स्थगित करण्यात याव्या, असे सभापती विक्रम ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
निवेदन देते वेळी वरुड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबाराव बहुरूपी, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नरेंद्र पावडे, मोर्शी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष मनोज इंगोले, वरुड शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष बंटी रडके, प्रा.किशोर तडस, वैभव पोतदार तसेच युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button