मराठी

रीपब्लिक वाहिनी व पत्रकार अर्णव गोस्वामी यांना कायदेशीर नोटीस

विदर्भ- मराठवाड्यातील सर्वच न्यायालयात मानहानी ठोकणार - किशोर तिवारी

प्रतिनिधी यवतमाळ– रिपब्लिक टीव्ही वाहिनीवर पत्रकार अर्णव गोस्वामी यांनी आपला  डिबेट मध्ये मानसिक छळ केला.
एवढेच नव्हे तर   महाराष्ट्र सरकार व  मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा एकेरी भाषेत खुनाचे आरोपी 
असा उल्लेख केला.  चित्रपट अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे 
यांचेवर बिनबुडाचे आरोप करीत त्यांना सातत्याने बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे सदर प्रकरणी रीपब्लिक वाहिनी 
तसेच पत्रकार अर्णव गोस्वामी यांना किशोर तिवारी यांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे. हात जोडुन माफी न मागीतल्यास
विदर्भ, मराठवाड्यातील सर्वच न्यायालयात त्यांच्याविरोधात मानहानी ठोकनार असल्याचा इशारा सुध्दा किशोर तिवारी यांनी दिला आहे. 

रिपब्लिक वाहिनीवर सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी डिबेट  ठेवण्यात आली होती. यामध्ये भाजपचे प्रवक्ते 
संबित पात्रा यांना सोबत घेऊन कट रचुन आपला डिबेट मध्ये अपमान केल्याची 
घटना १३ ऑगस्ट रोजी घडली. यामुळे   व्यथित झालेल्या वसंतराव नाईक शेती स्वावलंबन
मिशनचे (व्हीएनएसएसएम) राज्यमंत्री दर्जाचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी अर्णव गोस्वामी    यांच्यावर कायदेशीर 
नोटीस बजावली आहे. दरम्यान   आपला युक्तिवाद करताना  या वाहिनीवर ज्या पद्धतीने वादविवाद केले जातात तो  म्हणजे
“सर्वोच्च न्यायालयाचा अवमान” असून   भारताच्या घटनेची, अधिकारांची, कायद्याची तसेच
सर्व दंड संहितांची पायमल्ली असल्याचा आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे.  सदर प्रकरणात  गोस्वामी यांनी हात जोडून 
माफी न मागितल्यास  विदर्भ व  मराठवाड्यातील सर्व न्यायालयात  मराठी लोकांचे  श्रद्धास्थान मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे
यांच्या मानहानीचा व नुकसान भरपाईचे हजारो दावे टाकण्याचा निर्धार यावेळी किशोर तिवारी यांनी व्यक्त केला आहे.
गोस्वामी यांनी सुशांत प्रकरणात न्यायालयीन कामकाजात बाधा आणण्याचा आणि 
हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला आहे.  गोस्वामी हे डिबेट कार्यक्रमात   उद्धवजी ठाकरे यांना
आरोपी ठरविण्याचा प्रयत्न करीत  आहे. एकेरी भाषेत  ठाकरे कुटुंबीयांबाबत वक्तव्य केले जात आहे. हा सर्व प्रकार 
उध्दवजी ठाकरे यांना  नियोजितपणे बदणाम करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे. 
तिवारी पुढे म्हणाले की, चर्चेची संपूर्ण शैली आणि दृष्टीकोन हा पूर्वनिर्धारित पद्धतीने खोटी,  सोशल 
माध्यमांच्या  कथा आणि पूर्वग्रहित मानसिकतेवर आधारित होती.  हा देखील सर्वोच्च न्यायालयाचा 
अवमान आहे. तुमची आणि तुमच्या चॅनल्सची  ही कृत्यं अत्यंत बेकायदेशीर आहेत आणि फौजदारी बदनामी, 
सार्वजनिक अपमान करणारी आहे. आपल्या चॅनेल्सवरील कार्यक्रमांमुळे  घटनेनुसार हमी दिलेल्या मूलभूत
हक्कांचे उल्लंघन होत असल्यामुळे आपणास  दिवाणी खटल्याची नोटीस देत असल्याची माहिती किशोर  तिवारी यांनी दिली.
यापुर्वी रिपब्लिक टीव्हीने माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांना लक्ष्य केले होते. ललित मोदी प्रकरणाशी संबंध 
जोडल्यामुळे त्यांना हा धक्का सहन झाला नाही.  गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सुषमा स्वराज यांना   कर्करोग झाला आणि अति तणावाने 
त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे  भाजपचे खुनशी चर्चाकार संबित पात्रा ज्यांच्या मानसिक त्रासाने काँग्रेस प्रवक्ते राजीव त्यागी यांना सुध्दा
प्राणास मुकावे लागले. आपणासही अशाच प्रकारे तणाव देऊन  मारण्याचा कट होता असा आरोप सुध्दा किशोर तिवारी यांनी केला आहे.

प्रतिमा डागाळण्याचे प्रयत्न
रिपब्लिक टीव्ही ठाकरे कुटुंबीयांची  प्रतिमा डागाळण्याचे प्रयत्न करीत आहे. हा सर्व प्रकार  अभिव्यक्ती 
स्वातंत्र्यावर गदा आनणारा  आणि माध्यमांच्या स्वातंत्र्याचा  दुरुपयोग करणारा  आहे.  गोस्वामी 
यांनी  प्राइम टाइम कार्यक्रमात दोन्ही  हातांनी माफी मागितली पाहिजे.
असे न केल्यास त्यांच्या विरोधात अवमानना  केल्याची कारवाई केल्याशिवाय राहणार नाही

Back to top button