मराठी

मोदी, लामांवर चीनची नजर

हेरगिरीचे प्रकरण उघडकीस

नवी दिल्ली/दि.२१ – भारतात चीन हेरगिरी करीत असल्याचे उघड झाले आहे. पंतप्रधान कार्यालयाव्यतिरिक्त, दलाई लामा आणि भारतात लावण्यात आलेल्या सुरक्षा उपकरणांवरदेखील चिनी गुप्तहेरांचे लक्ष होते. पकडण्यात आलेल्या चिनी हेरगीरांची चौकशी केली असता ही महत्त्वाची माहिती हाती आली आहे. त्यात मंत्रालयामध्ये काम करणारे वरिष्ठ अधिकारी आणि ब्यूरोक्रेट्सबाबत माहिती गोळा केली जात होती. चिनी हेर qक्वग शी याची अधिक चौकशी केली असता चीनने भारतातील हेरगिरांच्या टीमला पंतप्रधान कार्यालयासह मोठ्या कार्यालयांमधील महत्त्वाची माहिती गोळा करण्याचे काम दिले असल्याची माहिती उघड झाली. कार्यालयामध्ये कोणती व्यक्ती सर्वात महत्त्वाची आहे, कोण कोणत्या पदावर कार्यरत आहे आणि तो किती प्रभावी आहे, अशी माहिती गोळा करण्याबाबत त्यांना सांगण्यात आले होते. चिनी हेरगीरांच्या पथकात महाबोधी मंदिरातील एक प्रमुख बौद्ध भिक्षू आणि कोलकात्यातील एका महिलेचा समावेश असल्याचे चौकशीत स्पष्ट होत आहे. qक्वग शी आणि या महिलेची भेट घडवून आणण्यात आली होती. ही महिला qक्वग शीला महत्त्वाची कागदपत्रे देत असे आणि qक्वग ती कागदपत्रे भाषांतरित करून चीनला रवाना करत असे. चिनी हेराच्या चौकशीत काही दस्तावेज सापडले आहेत. त्यानुसार, पंतप्रधान कार्यालयातील एक अधिकारी आणि दलाई लामा यांच्या सर्व कार्यक्रमांची माहिती मिळवली जात होती. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने गेल्या महिन्यात qक्वग शी याच्यासह त्याचा नेपाळी साथीदार शेर बहादूर आणि भारतीय पत्रकार राजीव शर्मा यांना अटक केली होती. हे तिघेही तिहारच्या तुरुंगात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात हेरगिरी करण्यासाठी या चिनी गुप्तहेराला चीन दरमहा एक लाख रुपये देत होते. ज्या दक्षिण दिल्ली भागात qक्वग राहात होती. त्या घराचे भाडे दरमहा ५० हजार रुपये होते. हे भाडे कोण भरत होते, याचा तपास केला जात आहे. जुलैमध्येच भारत सरकारने हेरगिरीसाठी वापरल्या जाणा-या दोनशेहून अधिक चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे.

Related Articles

Back to top button