मराठी

राठोडांनी राजीनामा दिला नाही, घेतला. चौकशीनंतर पुन्हा पुनर्वसनाची तयारी

मुंबई/दि.१ – वनमंत्री संजय राठोड यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला, हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दावा तितकासा खरा नाही. राठोड राजीनामा देण्यास तयार नव्हते, त्यांच्याकडून राजीनामा घेतला गेला, तसेच राठोड यांचे चौकशीनंतर पुनर्वसन केलेजाणार असल्याचेपक्षातून सांगण्यात येते.
राठोड यांनी रविवारी आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरेयांच्याकडेसुपूर्दकेला. त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या वर्षानिवासस्थानी आणि सह्याद्री अतिथीगृहावर मोठया नाटयमय घडामोडी घडल्या. राठोड हेवर्षानिवासस्थानी बैठकीला पत्नीला घेऊन आलेहोते. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी चौकशी होईपर्यंत राजीनामा राज्यपाल यांच्याकडेपाठवू नये, अशी विनंती त्यांनी उद्धव यांना केली. राठोड निष्कलंक आहेत हे बिंबवण्यासाठी राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलेपत्र पत्रकार परिषदेत वाचून दाखवलेगेले. तसेच पूजा चव्हाण हिचेवडील लहू, आई मंदोदरी आणि बहीण देवयानी यांना सह्याद्री अतिथीगृहावर आणण्यात आले. त्यांनी एक पत्र लिहून दिलेअसून आमची राठोडांबाबत तक्रार नाही, असा मजकूर त्यात आहे. हे पत्र पत्रकार परिषदेत वाचून दाखवण्यात आले.
राठोड यांचे काढलेले वन मंत्रालय मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवले आहे. याचाच अर्थ राठोड यांना क्लिन चीट मिळाल्यानंतर पुनर्वसन होऊ शकते, अशी शिवसेनेतील सूत्रांची माहिती आहे. शिवसेनेत राठोड प्रकरणी दोन मतप्रवाह होते. राठोड यांच्या कथित ध्वनिफीत संभाषणबाबतचा फॉरेन्सिक रिपोर्टअद्याप आलेला नाही, तोआल्यानंतर व गुन्हा नोंद झाल्यावर राजीनामा घ्यावा हा एक मतप्रवाह आणि राठोड यांचा राजीनामा घेतल्याने भाजपचा आत्मविश्वास दुणावेल म्हणून घेऊ नये, असा दुसरा मतप्रवाह होता; मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या आग्रहामुळेराजीनामा घेतल्याचेसांगण्यात येते. पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांनी राठोड यांना पाठीशी घातले. पोहरादेवी येथे गर्दी आपोआप जमली होती, असेउद्धव म्हणाले. तसेच राठोड प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची मागणी विरोधकांनी लावून धरल्यास खासदार डेलकर आत्महत्या प्रकरण भाजप नेत्यांवर गुन्हा नोंद होईल, असा सूचक इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. एकूण, शिवसेनेने व ठाकरे यांनी राठोड प्रकरणी गेले तीन-चार दिवस कथानक तयार केल्याचे झालेल्या घडामोडीवरून स्पष्ट झाले.

Related Articles

Back to top button