मुंबईः देशातील सर्वांत मोठ्या ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड‘ (आरआयएल) ने एक नवा इतिहास रचला आहे. ही १९३ अब्ज डॉलर्सची कंपनी बनली आहे. तिने नोव्हार्टिसला मागे टाकले आहे. नोव्हार्टिसची बाजारपेठ १९० अब्ज डॉलर्स आहे. आरआयएल पीपीचा (पास्र्ले पेड) हिस्सादेखील १,२९४ रुपयांच्या पातळीवर पोहोचला आणि तिची बाजारपेठ ५५ हजार कोटी रुपयांवर गेली. कंपनी २०० अब्ज एम कॅपच्या तुलनेत काही पाऊल मागे आहे. १५ जून रोजी आरआयएल पीपी समभाग ६९० रुपयांवर होते. ते आता जवळपास ९० टक्क्यांनी वाढले आहेत. रिलायन्सचे बाजार भांडवलही १३.६३ लाख कोटी रुपये होते. मुंबईच्या भांडवली बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीजचा सुमारे ९ टक्के वाटा आहे. राष्ट्रीय शेअर बाजारात तिचा वाटा १४ टक्के आहे. रिलायन्सचे मूल्य जास्त आहे. त्यामुळे दलाल गुंतवणूक करताना विचार करतात. असे असले, तरी बाजारमूल्य वाढणार असल्याने गुंतवणुकीतून जास्त परतावा मिळण्याची अपेक्षा आहे. आकडेवारीनुसार रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स डिसेंबर २००९ ते २०१३ या काळात चार पटींनी वाढले आहे. त्या वेळी बीएसईच्या मार्केट कॅपमध्ये रिलायन्सचा वाटा फक्त तीन टक्के होता. अलीकडेच जिओचे शेअर्स विकून वाढलेल्या निधीमुळे तिचा बाजारहिस्सा वाढत आहेत. मुंबई बाजारातील तिचा हिस्सा आता तीन पटीने वाढला आहे. आरआयएलची बाजारपेठ १९२ अब्ज डॉलर्स इतकी आहे. पुढील काही वर्षांत यात २०० अब्ज डॉलर्स ओलांडण्याची क्षमता आहे. सीएलएसएचा अंदाज आहे, की मार्च २०२२ पर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल २२० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकेल. रिफायनरी मार्जिन वाढण्याची अपेक्षा आहे विश्लेषकांचे म्हणणे आहे, की पुढील काही वर्षांत कंपनीचा सीएजीआर विकास दर डिजिटल आणि रिटेलपेक्षा चांगला असेल. या टप्प्यावर, कंपनीचे बाजार भांडवल २१० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त असू शकते. अशा परिस्थितीत शेअर्सची qकमत २,३०० रुपयांच्या वर जाऊ शकते.