मराठी

शेतीसाठी स्टेट बँक देणार ८५ टक्के कर्ज

खर्चाच्या ८५ टक्के रक्कम दीर्घ मुदतीच्या व्याजाने मिळणार

मुंबई/दि.१७ – शहरी दगदगीला वैतागला असाल आणि गावात काही करू शकत असाल, तर स्टेट बँकने मदतीचा हात पुढे केला आहे. शेतजमीन घेण्यापासून ते पिकांपर्यंत लागणा-या एकूण खर्चाच्या ८५ टक्के रक्कम दीर्घ मुदतीच्या व्याजाने मिळणार आहेत. शेती करायची इच्छा आहे; परंतु जमीन नाही, अशा लोकांसाठी ही योजना उपयुक्त आहे. एसबीआय लँड परचेज स्कीममधून ८५ टक्के रक्कम मिळेल, तर उर्वरित १५ टक्के रकमेची व्यवस्था संबंधित खरेदीदाराला करावी लागेल. स्टेट बँकेच्या या योजनेचा फायदा छोटया शेतक-यांना होऊ शकेल. काही लोक कराराने शेती करायला घेतात. त्यांना शेतमालक होण्याची संधी या योजनेमुळे मिळणार आहे. कर्ज घेऊन जमीन घेतल्यानंतर तिच्या सात-बाराच्या उता-यावर बँकेचे नाव असणार आहे. व्याजासह कर्ज परतफेड केल्यानंतर संबंधितांच्या नाववर जमीन होईल.

Back to top button