मराठी

शिवपेशवेकालीन श्रीरामप्रतिमा नाणे

अमरावती/प्रतिनिधि/दी.६ -अमरावती येथील निवृत्त पोलीस अधीक्षक पी टी उर्फ बाजीराव पाटील यांनी आपल्या पूर्वजांकडून असलेल्या इसवीसन सतराशे मधील नाण्याची पूजा राम मंदिर पाया भरण्याच्या दिवशी केली .हे नाणे बाजीराव पाटील यांच्या जळगांव घराण्यातील पूर्वज चंद्रभान पाटील यांच्याकडे शिव पेशवेकालीन पूर्वजां पासुन असल्याचे सांगितले जाते. सदर नाण्याची दरवर्षी रामनवमीच्या आणि लक्ष्मीू पुजनाच्या दिवशी पूजा सुद्धा केल्या जाते
एका बाजूला राम लक्ष्मण वनवासात जाण्याची व दुसऱ्या बाजूला राम-सीता ,लक्ष्मण , भरत ,शत्रुघ्न , हनुमान यांच्या प्रतिमा असलेल्या दिसतात . सदर नाणे सांभाळून ठेवणारी बाजीराव पाटील यांची सहावी पिढी असल्याची माहिती त्यांनी दिली .

Back to top button