मराठी

सुशांतसिंहचा तपास सीबीआयकडे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

महाराष्ट्र आव्हान देणार

नवी दिल्ली/दि. १९सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडे न देता तो सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय दिला आहे. बिहार सरकार या प्रकरणाचा तपास करण्याची शिफारस करण्यास सक्षम असल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. महाराष्ट्र सरकार मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देणार आहे.

मुंबई पोलिसांनी तपास केलेला नसून केवळ चौकशी केली आहे, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण पूर्णपणे सीबीआयकडे सोपवले आहे. या पुढे या प्रकणात कोणताही गुन्हा दाखल झाल्यास त्याचा तपास सीबीआयच करणार आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास करण्याचा अधिकार कुणाला आहे, या बाबतचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील सर्वच पक्षकारांचे लिखित जबाब मागवले होते. बिहार सरकार, रिया चक्रवर्ती आणि सुशांतसिंह राजपूत याच्या कुटुंबीयांकडून आपापले लिखित जबाब सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय आणि ईडीला आपला या प्रकरणातील तपास सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात यावे, असे जबाबात म्हटले होते.

पाटणा येथे दाखल झालेल्या प्रकरणावर महाराष्ट्र सरकारचा जबाबदेखील आला होता. बिहार सरकारने हे प्रकरण चुकीच्या धारणेतून दाखल केल्याचे महाराष्ट्र सरकारचे म्हणणे होते. या बरोबरच सीबीआयकडे हा तपास सोपवणे चुकीचे आहे, असेही जबाबात म्हटले आहे. बिहार सरकारने मात्र पाटण्यात दाखल केलेले प्रकरण योग्यच असल्याचे म्हटले आहे. मुंबई पोलिसांवर राजकीय दबाव असून याच कारणामुळे मुंबईत अजूनही प्रकरण दाखल झालेले नाही, असे बिहार सरकारचे म्हणणे होते. या प्रकरणातील बरेचसे व्यवहार हे मुंबईत झालेले आहेत. म्हणूनच या प्रकरणाचा तपास करण्याचा बिहार पोलिसांना काहीही अधिकार नाही, असा तर्क सुशांतसिंह प्रकरण ट्रान्सफर करण्याबाबतच्या याचिकेवर महाराष्ट्राकडून देण्यात आला. तर, ही याचिकाच चुकीची असून ती फेटाळून लावली जावी असे सीबीआयचे म्हणणे होते.

रियाला हवा होता मुंबई पोलिसांकडे तपास

बिहारमध्ये दाखल करण्यात आलेले हे प्रकरण मुंबईत ट्रान्स्फर व्हावे अशी मागणी करणारी याचिका रिया चक्रवर्तीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयात ११ ऑगस्ट या दिवशी या याचिकेवर सुनावणी झाली होती.

कुटुबीयांना हवा लवकर न्याय

सुशांतसिंहच्या आत्महत्येला दोन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही कोणताही निष्कर्ष निघू शकलेला नाही. या प्रकरणावर लवकरात लवकर न्याय मिळावा, असे सुशांतचे कुटुंबीय आणि मित्र परिवाराला वाटत होते. सुशांतqसहची बहीण श्वेताqसह कीर्ती, त्याची माजी गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेसह त्याचे मित्र आणि चाहते गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर न्यायाची मागणी करत आहेत.

पोलिस महासंचालकांची रियावर टीका

बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेय यांनी रिया चक्रवर्तीवर खालच्या भाषेत टीका करताना मुख्यमंत्री नितीशकुमार यांची भलावण केली आहे. याचा अर्थ बिहारचे पोलिस महासंचालक राजकारण्यांच्या हातचे कसे बाहुले झाले आहेत, हे स्पष्ट् होते.

Related Articles

Back to top button