मराठी
जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळाकडे शिक्षकांचे लक्ष
विभागिय आयुक्त अमरावती यांची मंजुरी मिळुनही पुरस्कार वितरण सोहळा नाही
-
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या मागणी कडे दुर्लक्ष
अमरावती दि.२५ – दरवर्षाला अमरावती जिल्हा परिषद कडून जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येतो, पण सन २०१९-२० चे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार आज पर्यंत देण्यात आले नाही.हे पुरस्कार २६ जानेवारी २०२१ ला प्रजासत्ताक दिनी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा घेण्यात यावा.अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने,जि.प. अमरावतीचेअध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण सभापती व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना केली होती या मागणीचा विचार करुन अमरावती जि.प.प्रशासनाने अंतिम मंजुरी करीता अमरावती विभागिय आयुक्त यांच्या कडे सादर करण्यात आला होता. त्याला मंजुरी मिळाली आहे.मंजुरात मिळुन सुध्दात्या जिल्हातील १५शिक्षक आदर्श पुरस्कार पासुन वंचित राहत आहे. यामुळे शिक्षक वर्गात नाराजीचा सुर आहे.
महाराष्ट्र शासनाने ३ जानेवारी २०२१ हा दिवस “महीला शिक्षण दिन” म्हणुन साजरा करण्याचे घोषित केले होते त्या दिवसाला पुरस्कार वितरण करण्याची मागणी शिक्षक समिती केली होती पण विभागिय आयुक्त कार्यालयातुन यादिला मंजुरात मिळाली नव्हती आता यादि मंजुर झाली असुन आताआयोजनाचे काम प्राथमिक शिक्षण विभागाचे आहे..शिक्षण क्षेञात उत्कुष्ट कार्य करणार्या शिक्षकांना यामुळे नाराजी पसरली आहे.आपल्या चांगल्या कार्याचा गौरव योग्य वेळी होत नाही.५सप्टेंबरला दिल्या जाणारे आदर्श शिक्षक पुरस्कार ३ जानेवारीला सुध्दा मिळले नाही आता २६जानेवारीला तरी मिळती अशी आश्या असतांना तेही धुळीत मिळाली आहे. याला शिक्षण विभागाचा वेळ काढु धोरण म्हणावे अशा प्रश्न उपस्थित होत आहे.संघटनांच्या मागणीचा सकारात्मक विचार अमरावती जिल्हा परीषद कार्यालयाने केलेला नाही.जिल्हातील तमाम शिक्षक बंधु भगिनी यांच्या नजरा शिक्षक पुरस्कारा कडे लागल्या आहे.जिल्हातील १४प्राथमिक व १माध्यमिक शिक्षकाची निवड या पुरस्कारा साठी झाली आहे.आता पुरस्काराचा कोणता दिवस उजडणार असा प्रश्न संघटनेला पडला आहे.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लांबलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुरस्कार निवडीसाठी पाठविण्यात आलेल्या १५ शिक्षकांच्या यादीला विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी ११ जानेवारी रोजी मंजूरी दिली आहे. त्यात १४ प्राथमिक शिक्षक विभागाच्या शिक्षकांचा समावेश आहे.२६जानेवारी नंतर आता पुरस्कार समारंभ आयोजनाचा मुहुर्त कधी निघणार आहे.
-
निवड झालेल्या प्राथमिक शिक्षकांमध्ये
बबलु कराडे(अचलपूर),
श्रीमती शहाजहाॅ परवीन मो.याकुब(अमरावती),कु.वैशाली सरोदे(अंजनगाव सुर्जी),लखन जाधव (भातकुली),मंगेश वाघमारे(चांदुर बाजार), मनोज वानखडे(चांदुर रेल्वे),वैजनाथ इप्पर (चिखलदरा),उमेश आडे (धामणगाव रेल्वे),किशोर बुरघाटे(दर्यापूर),श्रीमती योगिता भुमर (धारणी) , सौ.प्रियंका काळे (मोर्शी), अहमद खान पटेल (नांदगाव खंडेश्वर)सचिन विटाळकर(तिवसा),नंदकीशोर पाटील(वरुड)