मुंबई/दि. १२ – देश विदेशातील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचारयाना कोरोना आणि टाळेबंदीच्या संकटामुळे पगारवाढ दिलेली नाही. या वर्षी तरी पगारवाढ मिळेल अशी भोळी अपेक्षा नोकरी करणाèयांना असताना एक निराशाजनक अहवाल हाती आला आहे. त्यानुसार, या वर्षी बहुतांश कंपन्या आपल्या कर्मचारयाचा पगार वाढवणार नाहीत. ‘टीमलीज‘ने नोकरी आणि वेतनावर अहवाल सादर केला आहे. त्यानुसार, मोजक्याच कंपन्या आपल्या कर्मचारयाना या वर्षी पगारवाढ देणार आहेत. त्यातही ही पगारवाढ अत्यल्प असेल. ‘टीमलीज‘च्या अहवालानुसार, या वर्षी केवळ ई-कॉमर्स, एफएमसीजी, बीपीओ आणि आयटी सेक्टरमध्ये पगारवाढ होण्याची शक्यता आहे. एअरलाइन इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी आणि खर्च कपात होण्याची भीती आहे. ऑटोमोबाइल उद्योगातसुद्धा गेल्या वर्षभरापासून मंदी आहे. नुकसान होत असल्याने या सेक्टरमध्येसुद्धा कर्मचारी कमी केले जाऊ शकतात. पर्यटन आणि हॉटेल, रेस्तरॉ व्यवसायसुद्धा ठप्प आहे.
अशात या सेक्टरमध्ये पगारकपात केली जाऊ शकते. ‘टीमलीज सव्र्हिसेस‘च्या कार्यकारी उपाध्यक्ष ऋतुपर्णा चक्रवर्ती यांच्या म्हणण्यानुसार एकीकडे अनेक कंपन्या आपल्या कर्मचाèयांना पगारवाढ देण्यास संकोच करत आहेत, तर दुसरीकडे, स्पेशल स्किल्स असलेल्यांना यात फायदा होत आहे. कोरोना महामारीमुळे काही क्षेत्रांमध्ये कर्मचाèयांची मागणी वाढल्याचेदेखील दिसून आले आहे.