मराठी

सरकारही पाडणार नाही आणि फूटही

भाजपचे स्पष्टीकरण; पवार कुटुंबातील वादावर भाष्य

मुंबई/दि.१३ – ‘आम्हाला कुणाच्याही कुटुंबात फूट पाडण्याची इच्छा नाही किंवा सरकार पाडण्याचा प्रयत्नही आम्ही करणार नाही,‘ असे भारतीय जनता पक्षाने स्पष्ट केले. पवार कुटुंबातील कथित मतभेदांच्या पाश्र्वभूमीवर भाजपने ही प्रतिक्रिया दिली.

अयोध्येतील राम मंदिर आणि सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी पक्षाशी विसंगत भूमिका घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता होती. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना ही कोंडी फोडली. पवार यांनी नातू पार्थ यांना जाहीरपणे झापले. तेव्हापासून पवार कुटुंबीयांतील मतभेदाची चर्चा पुन्हा एकदा उफाळून आली आहे. भाजपकडूनही याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी तर पार्थ यांना ‘मित्रा थांबू नकोस‘ असे म्हणत त्यांचे कौतुक केले आहे.

या पाश्र्वभूमीवर भाजपचे आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी भूमिका मांडली आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसवर त्यांनी जोरदार टीका केली. ‘स्वत:च्या घरातला व पक्षातला विसंवाद लपवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपचे आमदार फुटणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. पक्षातील अडचणीतून व अपयशातून मार्ग काढण्यासाठी अतिशय योजनाबद्ध पद्धतीने या बातम्या पसरवल्या जात आहेत; मात्र त्यांच्या या प्रयत्नांना अजिबात यश मिळणार नाही,‘ असे शेलार यांनी म्हटले आहे. प्रसारमाध्यमे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या अशा वक्तव्यांना प्रसिद्धी का देतात, याबद्दलही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. .

 

पवार-पाटलांत संवाद असला, तरी पुरे! 

जयंत पाटील व अजित पवार यांनी स्वत:च्या पक्षात संवाद साधला, तरी खूप आहे. त्यांनी इतर पक्षाच्या आमदाराची qचता करू नये. स्वत:चा पक्ष आणि सरकार वाचवा,‘ असा टोलाही शेलार यांनी लगावला.

Related Articles

Back to top button