वनमंत्र्यांचा राजीनामा चार दिवसांनंतरही मुख्यमंत्र्यांकडेच
मुंबई/दि.३ – वनमंत्री संजय राठोड हे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून अडचणीत सापडले आहेत. त्यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला; मात्र त्यानंतर हा राजीनामा अद्यापही मु‘यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच आहे. हा राजीनामा अद्यापही राज्यपालांकडे गेलेला नाही.
राठोड यांनी राजीनामा देऊन चार दिवस उलटले आहेत, तरीही त्यांचा राजीनामा अजून मु‘यमंत्र्यांकडेच आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या राठोड अद्यापही वनमंत्री पदावर कायम आहेत. केवळ राजीनामा घेऊन शिवसेनेने राजकीय खेळी तर केली नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर मु‘यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषेदत या विषयावर भाष्य केले होते. राजीनामा स्वीकारला की नाही, या प्रश्नावर म्हणाले, की राजीनामा दिला नाही, तो स्वीकारला आहे’. मात्र असे असतानाही हा राजीनामा अद्यापही मुख्यमंत्र्यांच्याच खिशात आहे.
बीड जिल्ह्यातील परळी येथील 22 वर्षीय पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यातील वानवडी भागात आत्महत्या केली. या तरुणीच्या आत्महत्येस महाविकास आघाडी सरकारातील वनमंत्री संजय राठोड जबाबादार असल्याचा आरोप होत होता. पूजा ज्या व्यक्तीशी बोलत आहे, अशा अनेक ध्वनिफिती समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्या होत्या. यानंतर भाजपने आक‘मक भूमिका घेतली होती.