मराठी

कोळसा घोटाळ्याचा काळिमा

कोलकात्ता/दि. २६ – पश्चिम बंगालमधील कोळसा घोटाळा आता अधिकारी आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांपर्यंत पोहोचला आहे. तृणमूल काँग्रेसशी संबंधित व्यावसायिकाच्या घरांवर सीबीआय आणि ईडीने शुक्रवारी छापे टाकले. दक्षिण कोलकाता, आसनसोल येथील घरे व कार्यालयांत छापे टाकण्यात आले आहेत.
गेल्या वर्षी डिसेंबरच्या सुरुवातीला कोलकाताचेसीए गणेश बाग्रियावर छापा टाकण्यात आला होता. सीबीआयच्या पथकाने ही कारवाई केली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भाचेसून व नातेवाइकांचीही चौकशी करण्यात आली आहे या प्रकरणात दोन दिवसांपूर्वी सीबीआयने रुजिरा बॅनर्जी आणि रुजिराची बहीण मेनका गंभीर यांची चौकशी केली. पैशांच्या व्यवहाराबाबत आणि मिळकतीची माहिती दोघींकडून घेण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आता सीबीआय या सर्वांच्या बँक खात्याची व मालमत्तांचीही चौकशी करीत आहे. चौकशीत ईडीचादेखील समावेश करण्यात आला आहे. काळ्या बाजारात हजारो कोटींचा कोळसा विकल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवर आहे. बंगालमध्येअनेक हजार कोटी रुपयांच्या कोळशाचे अवैधपणे उत्खनन केल्याचा आरोप आहे.
सप्टेंबर 2019 मध्ये कोळसा घोटाळ्याची चौकशी सुरू झाली, तेव्हापासून टीएमसी नेत्यांनी शेल कंपन्यांच्या माध्यमातून कोळसा घोटाळ्यातील काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. याचा सर्वांत मोठा फायदा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पुतण्या अभिषेकला झाला आहे. अभिषेक तृणमूलच्या युवा संघटनेचेअध्यक्ष आहेत. त्यांनी विनय मिश्रा यांच्यासह 15 तरुणांना सरचिटणीस केले. विनय यांच्यावर सुरुवातीपासूनच कोळसा घोटाळ्याचा आरोप आहे. तृणमूलने सीबीआय चौकशीला स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, ती फेटाळण्यात आली.

 

Related Articles

Back to top button