मुंबई/दि.२७ – रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) फ्युचर रिटेल लिमिटेड (FRL) बरोबर व्यवहार करू शकत नसेल, तर दिवाळखोरीत जाईल. अमेझॉन डॉट कॉमच्या याचिकेवर सिंगापूरच्या लवादाच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान फ्युचर रिटेलने हे सांगितले. अँमेझॉनने फ्युचर ग्रुप आणि रिलायन्स कराराविरोधात याचिका दाखल केली. श्रमेझॉनच्या बाजूने निकाल देऊन लवाद न्यायलयाने हा सौदा स्थगित केला. ऑगस्टमध्ये रिलायन्स आणि फ्युचर ग्रुपमध्ये २४ हजार ७१३ कोटी रुपयांचा करार झाला. त्याअंतर्गत फ्युचर समूहाने आपला रिटेल, घाऊक व लॉजिस्टिक्स व्यवसाय रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेडला विकला. ऑगस्ट २०१९ मध्ये मेझॉनने फ्युचर कूपनमध्ये ४९ टक्के भागभांडवल खरेदी केले. यासाठी अॅमेझॉनने दीड हजार कोटी रुपये भरले होते. अॅमेझॉनला तीन ते दहा वर्षांच्या कालावधीनंतर फ्युचर रिटेल लिमिटेडचा भाग खरेदी करण्याचा अधिकार असल्याचे या करारामध्ये नमूद करण्यात आले होते. अॅमेझॉनच्या म्हणण्यानुसार, या करारातील एक अट म्हणजे फ्युचर ग्रुप आपली किरकोळ मालमत्ता मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपला विकणार नाही. अॅमेझॉनने फ्युचर ग्रुपवर कराराचा भंग केल्याचा आरोप केला आहे. अॅेमेझॉन या जेफ बेझोस कंपनीने लवादाच्या न्यायालयात सांगितले, की फ्युचर समूहाने रिलायन्सला किरकोळ मालमत्ता विकून कराराचे उल्लंघन केले. दुसरीकडे, फ्युचर ग्रुपने लवादाच्या न्यायालयात म्हटले आहे, की जर रिलायन्सशी करार केला नाही, तर त्यांचे १५०० आउटलेट बंद करावे लागतील. यामुळे फ्युचर ग्रुप आणि विक्रेते फर्मच्या सुमारे २९ हजार कर्मचा-यांच्या नोक-यांवर संकट निर्माण होईल. फ्युचर ग्रुपने लवादाच्या न्यायालयात सांगितले, की कोरोनामुळे अनेक भारतीय व्यवसायांवर परिणाम झाला. विशेषतः किरकोळ क्षेत्रात त्याचा परिणाम झाला आहे. फ्युचर ग्रुपने म्हटले आहे, की एफआरएल-रिलायन्स कराराचे उद्दीष्ट फंडांच्या संक्रमणाद्वारे सर्व भागधारकांच्या हितांचे रक्षण करणे होते. तथापि, लवाद व्ही.के. राजा म्हणाले, की कायदेशीर औपचारिकता न पाळणे हे कायदेशीर नाही. लवादाच्या न्यायालयाचे एकमेव लवाद व्ही.के.राजा यांनी सध्या हा करार थांबविण्याची मागणी केली आहे. या प्रकरणातील लवादाचा अंतिम निर्णय येईपर्यंत हा करार पूर्ण होऊ शकत नाही, असे राजा यांचे म्हणणे आहे. या प्रकरणात अंतिम निर्णय घेण्यासाठी आता तीन सदस्यांचे खंडपीठ स्थापन केले जाईल. हे खंडपीठ ९० दिवसांत अंतिम निर्णय घेईल. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांच्याशी रिलायन्स भारतातील ऑनलाइन किरकोळ बाजारात स्पर्ध करू पाहते आहे. अॅमेझॉन भारतात ऑनलाईन व्यवसायाबरोबरच ऑफलाइन रिटेल व्यवसायामध्ये आपली पकड आणखी मजबूत करण्यासाठी काम करीत आहे. यासाठी मेझॉनने २०१८ मध्ये खासगी इक्विटी फंड समारा कॅपिटलसह आदित्य बिर्ला समूहाची सुपरमार्केट चेन मिळविली.
रिलायन्समध्ये आठ कंपन्यांची गुंतवणूक
सध्या देशात रिलायन्स रिटेल सुमारे १२ हजार स्टोअर्स चालवित असून मुकेश अंबानी किरकोळ बाजारात मोठी खेळी करण्याच्या विचारात आहे. रिलायन्स रिटेलचे इक्विटी मूल्यांकन सध्या २८.२२ लाख कोटी रुपये आहे. त्यामध्ये सतत भागभांडवल विकले जात आहे. आतापर्यंत सुमारे ८ कंपन्यांनी यात गुंतवणूक केली आहे. मुकेश अंबानी यांनी आतापर्यंत आपला हिस्सा विकून ३७ हजार कोटी रुपये जमा केले आहेत. रिलायन्स रिटेलदेखील जिओमार्टद्वारे डिजिटल डिलीव्हरी करत आहे.