मराठी

मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयात वृक्ष रक्षाबंधन

अमरावती/दी २४– श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित, मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयात आय. क्यू. ए. सी. अंतर्गत हिरवाई उपक्रमांच्या माध्यमातून , *झाडे लावा झाडे* *जगवा* हा संदेश देत रक्षाबंधनाच्या निमित्ताने झाडांना राखी बांधून ते संवर्धन करण्याचा संदेश देण्यात आला. प्राचार्य डॉ. छाया विधळे यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय सेवा योजना च्या वतीने हा कार्यक्रम संपन्न झाला. राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे वृक्षसंवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनावर प्रतिबिंबित व्हावे म्हणून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून झाडांना राख्या बांधून वृक्ष संवर्धनाचा संदेश या निमित्ताने देण्यात आला या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ छाया विधळे ,डॉ. स्मिता ठाकरे, डॉ कुमुदिनी चौधरी ,डॉ साधना देशमुख, प्रा.साधना मोहोड, डॉ.शर्मिला कुबडे , प्राची भांबुरकर तसेच डॉ मंगेश देशमुख राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी व डॉ. मंदा नांदुरकर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी व विद्यार्थ्यांनी झाडांना राखी बांधून झाडे जागवण्याचा संदेश वृक्ष रक्षाबंधनाच्या निमित्ताने देण्यात आला..

Related Articles

Back to top button