मुंबई दी ५ – केंद्र सरकार दुचाकी आणि चारचाकी वाहनांवरील जीएसटी (GST) दर कमी करण्याचा विचार करीत आहे. असे झाल्यास देशात दुचाकी आणि चारचाकी स्वस्त होतील. ऑटोमोबाईल उद्योग दीर्घ काळापासून कार आणि बाइकवरील जीएसटीमध्ये कपात करण्याची मागणी करत आहे.
केंद्रीय उद्योगमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याशी या संदर्भात चर्चा करण्याचे आश्वासन दिले. तत्पूर्वी नुकत्याच झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत सीतारामण यांनीही वाहनांवरील जीएसटी दर कमी करण्याचे संकेत दिले होते.
या प्रस्तावावर अर्थ मंत्रालय काम करत असल्याचे जावडेकर यांनी सांगितले. ते म्हणाले, की काळाची गरज लक्षात घेऊन दुचाकी, तीन चाकी व सार्वजनिक वाहतुकीचा वेगळा प्रकार तयार करता येईल. यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या कार व इतर वाहनांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या श्रेणी तयार करून जीएसटी दर कमी करता येऊ शकतात.
सरकार जीएसटीचा दर पाच ते दहा टक्क्यांपर्यंत कमी करण्याची शक्यता आहे. ऑटो स्क्रॅपेज पॉलिसी लवकरच लागू केली जाईल, असे संकेतही जावडेकर यांनी दिले. जावडेकर यांनी सांगितले, की ऑटो स्क्रॅपॅप पॉलिसीचा प्रस्ताव तयार झाला असून सर्व संबंधित विभागांनी पक्षांनी यावर आपले मत मांडले आहे. ते म्हणाले, की लवकरच याबाबतचे धोरण जाहीर केले जाऊ शकते. ऑटोमोबाईल उद्योग हा अर्थव्यवस्थेसाठी अतिशय महत्वाचा आहे आणि स्पर्धा वाढविण्यासाठी प्रोत्साहन देऊन या उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यास आमचा पाठिंबा आहे. वाहनांवरील जीएसटी दर कमी केल्याने सरकारला फायदा होईल, असे ऑटोमोबाईल उद्योगाला वाटते. पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांच्याशी अन्य संबंधित लोकांशी नक्कीच याबद्दल चर्चा करेन. मला आशा आहे, की या दिशेने प्रगती होईल.