मराठी

नागपुरात गुरूवारी कोरोनाबाधितांची विक्रमी नोंद

एकाच दिवसात तब्बल १२७० नवे रूग्ण

नागपुर/दि २७ – राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात गुरूवारी एकाच दिवशी तब्बल १२७० नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. एकाच दिवशी १२७० रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मागील पाच महिन्यातील ही विक्रमी संख्या आहे. तर, दिवसभरात ४५ मृत्यू झाल्याने आजपर्यंतच्या बळींची संख्या ९०४ वर पोहचली आहे. नागपुर शहर  आणि ग्रामीण भागात पहिल्यांदाच १,२७० नवीन बधितांचा उच्चांक नोंदवण्यात आल्याने चिंता वाढली आहे. नागपुरात झालेल्या ४५ मृत्यूपैकी नागपूर शहरात ३५, ग्रामीण ८, जिल्ह्याबाहेरील २ मृत्यूचा समावेश आहे. शहरात प्रथमच तब्बल १,२७० नवीन बधितांची नोंद झाली. त्यात शहरातील १,००४, ग्रामीणचे २६४ जणांचा समावेश आहे.
शहरात दिवसभरात ८३४ तर ग्रामीणमध्ये २३० असे १०५४ जण करोनामुक्त झाले. त्यामुळे आजपर्यंतच्या शहरातील करोनामुक्तांची संख्या १०५८६ तर ग्रामीणमध्ये ४१७७ असे एकूण १४७६३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या प्रथमच ७०३६ रुग्ण, ग्रामीणचे २०६२ रुग्ण असे एकूण ९०९८ वर पोहचली आहे

Related Articles

Back to top button