वर्धा/दि.05- महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात विद्यार्थ्यांना विविध कार्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी ‘एकल खिडकी प्रणाली’ सुरू करण्यात आली. याद्वारे विद्यार्थ्यांच्या समस्यांचे अर्ज स्वीकारले जातील. या प्रणालीमध्ये, विद्यार्थी ऑनलाइन आणि वैयक्तिकरित्या अर्ज करू शकतील. विश्वविद्यालयाचे कुलसचिव डॉ. धरवेश कठेरिया यांच्या पुढाकाराने ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.
ही प्रणाली अकादमिक विभागांतर्गत सुरू करण्यात आली आहे. विश्वविद्यालयाच्या शैक्षणिक कार्याला आणखी गती देण्यासाठी ‘एकल खिडकी प्रणाली’ प्रभावी ठरेल. विश्वविद्यालयात देशाच्या विविध भागातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. त्यांच्या अभ्यासादरम्यान त्यांच्या शैक्षणिक समस्यांचे त्वरीत निराकरण करण्यासाठी विश्वविद्यालयाने विविध प्रकारच्या सुविधा आणि उपाय योजना राबवल्या आहेत ज्यामध्ये ‘एकल खिडकी प्रणाली’ ही एक प्रभावी योजना आहे. विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, अशी अपील विश्वविद्यालयाचे कुलसचिव डॉ. धरवेश कठेरिया यांनी केली.