अन्य

आगामी निवडणूक व सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर चांदूरबाजार पोलिसांकडून मॉक ड्रिल

आगामी लोकसभा निवडणूक व इतर निवडणुका, आदर्श आचारसंहिता, धुलीवंदन, रमजान ईद, राम नवमी, हनुमान जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व इतर सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस प्रशासनाने अशा वेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होणे आवश्यक आहे. परिस्थिती पाहून पोलीस निरीक्षक यांनी आरसीपी पथक, दंगा काबू पथक व परिसरातील पोलीस स्टेशन मधील अंमलदार व अधिकाऱ्यांनी परिस्थितीत योग्य तो निर्णय घेऊन पोलिसांनी‌‌ लाठी चार्ज व अश्रू धुराच्या नळकांड्या फोडून परिस्थिती कशी नियंत्रणात येते, यासाठी आज अमरावतीच्या चांदूरबाजार शहरामध्ये चांदूरबाजार पोलिसांकडून मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते.

Related Articles

Back to top button