अन्य

विद्यापीठाला उर्जा संवर्धन क्षेत्रात राज्य शासनाचा राज्यस्तरीय पुरस्कार

उर्जा, जल व पर्यावरण संवर्धनात विद्यापीठाचे उत्कृष्ट कार्य

अमरावती/दी १५- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाला राज्य शासनाच्या महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरणाचा (महाउर्जा) सोळावा राज्यस्तरीय 2020-21 चा उर्जा संवर्धन पुरस्कार घोषित झाला आहे.  विद्यापीठ स्तरामध्ये द्वितीय क्रमांक संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाला मिळाला आहे.  महाराष्ट्र राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांमधून एकमेव संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाला उर्जा संवर्धन पुरस्कार घोषित झाल्याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे, प्रभारी कुलगुरू डॉ. विलास भाले, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी विभागातील सर्व अधिकारी व कर्मचा­यांचे अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरणचे महासंचालक यांनी उर्जा संवर्धन पुरस्काराची घोषणा केली, त्यामध्ये विद्यापीठ गटात प्रथम पुरस्कार डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला या विद्यापीठाला, तर द्वितीय पुरस्कार संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाला घोषित झाला आहे.  विद्यापीठाने वर्ष 2018 मध्ये विद्यापीठातील सात इमारतींवर 576 के.डब्ल्यु.पी. इतक्या क्षमतेच्या स्थापित केलेल्या सौर उर्जा प्रकल्पातुन प्रतिवर्ष  8,08386 युनीट विज निर्मीती होत असुन त्यातून दरवर्षी 50.00 लक्ष रूपये विज देयकाची बचत होत आहे. विद्यापीठाने अत्याधुनिक विज उपकरणांसह फाईव्ह स्टार रेटींग, ए.सी, बी.एल.डी.सी. फॅन, विद्युत दिवे आदी वापरण्यास सुरूवात केली असून जवळपास पन्नास टक्के उपकरणे फाईव्ह स्टार रेटींग असलेल्या उपकरणांमध्ये  बदलविली आहेत.
विद्यापीठाने जलसंवर्धनाच्या क्षेत्रात सुद्दा उत्तुंग भरारी  घेतली आहे.  परिसरात 200 न् 60 न् 10 फुट आकाराचे 50 कोटी लिटर पाणी साठवण क्षमतेचे दोन मोठे शेततळे निर्णाण केलेले असुन परिसराबाहेर वाहुन जाणारे पावसाचे पाणी परिसरात अडवून मुरविण्यात येते. विद्यापीठातील सर्व मोठ¬ा इमारतींचे रेन वॉटर हार्वेस्टींगद्वारे जलव्यवस्थापन करण्यात येत असुन विद्यापीठात सहा मोठे शेततळे व दोन मोठ¬ा जलतलावांची निर्मिती यापूर्वीच करण्यात आली आहे.  घनकचरा व्यवस्थापन,  पाण्याचा पुनर्वापर आदी योजनां लवकरच पूर्णत्वास येणार आहेत.
विद्यापीठास उर्जा संवर्धन, जलव्यवस्थापन इ. कामांकरीता केंद्र शासन, सेसी, रूसा, मेडा, महाराष्ट्र शासनाकडुन अनुदान प्राप्त झाले असुन विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेनेही ह्रा कामांकरीता विद्यापीठ निधीतुन निधी उपलब्ध करुन दिला आहे. विद्यापीठाच्या विविध प्राधिकारीणी, प्रशासकीय विभाग, शैक्षणिक विभागांनी उर्जा संवर्धन, जलव्यवस्थापन व घनकचरा व्यवस्थापन या क्षेत्रात निरंतर कार्य केले असुन विद्याथ्र्यामध्ये जागरूकता निर्माण करण्याकरीता मोलाचा वाटा उचलला आहे.
कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठात नाविन्यपूर्ण योजना राबविल्या जात असून त्यांच्या पुढाकारामुळे अनेक योजनांना चालना मिळत आहे.  विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता श्री शशीकांत रोडे यांनी पी.पी.टी. द्वारे प्रस्तावाचे उत्कृष्टपणे सादरीकरण केले होते. या कार्यासाठी त्यांना त्यांचे विभागातील श्री राजेश एडले (वि.उप अभियंता), श्री गजानन वनस्कर (कनिष्ठ अभियंता), श्री आकाश सोळंके (कनिष्ठ अभियंता), श्री संजय धाकुलकर (कनिष्ठ अभियंता), श्री विजय चवरे (कनिष्ठ अभियंता), अधीक्षक श्री विलास काकडे, श्री मनिष शास्त्री, श्री प्रविण पडोळे, श्री किशोर गजघुमे यांचे सहकार्य लाभले.  विद्यापीठाला यापूर्वी पर्यावरणासाठी राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले असून विद्यापीठाच्यावतीने सुद्धा पर्यावरण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा­या व्यक्ती वा संस्थेला पर्यावरण पुरस्कार देवून दरवर्षी ससन्मानीत केल्या जाते.  विद्यापीठाला महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरणाचा सोळावा राज्यस्तरीय उर्जा संवर्धन पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विद्यापीठाचे सार्वत्रिक अभिनंदन होत आहे.

Related Articles

Back to top button