मुख्य समाचार

वीकेंड’ची बंदी हटवली

आता शनिवार- रविवारीही बाजारपेठा सुरू ठेवण्यास मुभा

  • जिल्हा दंडाधिका-यांकडून आदेश जारी

अमरावती, दि. १९ : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने जिल्ह्यात जारी असलेली आठवड्याअखेरच्या दोन दिवसांची संचारबंदी रद्द करण्यात आली आहे. तसा आदेश जिल्हा दंडाधिकारी शैलेश नवाल यांनी आज जारी केला.
आपत्ती व्यवस्थापन कायदा, तसेच साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यान्वये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदीत शनिवार व रविवारी बाजारपेठा बंद ठेवण्याबाबत आदेश काढण्यात आले होते. शुक्रवारी संध्याकाळी सातपासून ते सोमवारी सकाळी सातपर्यंत दर आठवड्यात या आदेशान्वये संचारबंदी लागू होती. तथापि, अनलॉकिंगच्या प्रक्रियेचा पुढचा टप्पा म्हणून आठवड्याअखेर असलेली संचारबंदी रद्द आली आहे.
विविध व्यवसायांपुढे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी व नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, जिल्ह्यातील कोरोनाची साथ लक्षात घेता मास्कचा वापर, स्वच्छता व सोशल डिस्टन्सचे पालन नागरिकांनी काटेकोरपणे करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बाजारपेठा व दुकाने सुरू ठेवताना घ्यावयाची दक्षता व आवश्यक तपासण्या, स्वच्छता, निर्जंतुकीकरण आदी बाबींचे पालन याबाबत वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचे पालन संबंधितांनी काटेकोरपणे करावे, असेही स्‌पष्ट करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button