विदर्भ

राज्यात आंतरजिल्हा बस सेवा व कोचिंग क्लासेस शुरू करणार

मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार नी दिली माहिती

चंद्रपूर/दि.१५- राज्यात आंतरजिल्हा एस. टी. बस सेवा कोविड नियम पाळून सुरू करणार असल्याची घोषणा मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपुरात केली आहे. कोरोना संकट वाढत असले तरी एका एसटी बस मध्ये 20 पेक्षा अधिक प्रवासी नेऊ न देता ही सेवा सुरू करण्याचा मानस सरकारने व्यक्त केला आहे. सोबतच राज्यातील कोचिंग क्लासेस आणि स्पर्धा परीक्षा केंद्र कोरोना नियम पाळून प्रारंभ करण्याची तयारी सरकारने दाखवली आहे.
वडेट्टीवार यांनी ऐन संकट काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सेवा सोडणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. प्रसंगी मेस्मा लावला जाणार आहे. चंद्रपूर शासकिय वैद्यकीय महाविद्यालयातील 5 डॉक्टरांना याचसाठी नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत.चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांसोबत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. या वेळी बोलताना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी कोरोना काळात उत्तम सेवा देणाऱ्या जिल्हा प्रशासनाची आणि आरोग्य प्रशासनाची प्रशंसा केली. सोबतच वर्तमान स्थिती पाहता आपत्ती व्यवस्थापन विभागातील सर्व रिकामी पदं तातडीने भरण्यात येईल अशी घोषणा केली.

Related Articles

Back to top button