हिंदी विश्वविद्यालय में गांधी विचारों पर 19- 20 को अंतरराष्ट्रीय वेबिनार
वर्धा,दि.18 सप्टेंबर 2020: महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय व स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्र, सूरीनाम यांच्या संयुक्त विद्यमाने 19 रोजी ‘महात्मा गांधी यांचा प्रवासी भारतीयांकरिता सत्याग्रह’ या विषयावर तथा हिंदी विश्वविद्यालय व ‘उपमा’ आणि ‘विश्व हिंदी ज्योति’ अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने 20 रोजी‘महात्मा गांधी आणि आंतरराष्ट्रीय हिंदी’ या विषयावर आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रो. रजनीश कुमार शुक्ल राहतील.
सूरीनामसोबत आयोजित वेबिनारमध्ये सूरीनामच्या नीती सल्लागार व डायस्पोरा विशेषज्ञ सुश्री वनिता रामनाथ, संयुक्त राष्ट्र संघाचे माजी आंतरराष्ट्रीय राजनयिक श्री सर्दानंद पंचू, स्वामी विवेकांनद सांस्कृतिक केंद्र, भारतीय दूतावास, सूरीनामचे निदेशक डॉ. शरद कुमार तथा हिंदी विश्वविद्यालयातील जनसंचार विभागाचे प्रो. अनिल कुमार राय अंकित आणि महात्मा गांधी फ्यूजी गुरूजी सामाजिक कार्य अध्ययन केंद्राचे डॉ. के. बालराजु वक्तव्य देतील. आभार कार्यकारी कुलसचिव क़ादर नवाज़ ख़ान मानतील.
हिंदी विश्वविद्यालय, ‘उपमा’ व ‘विश्व हिंदी ज्योति’ अमेरिकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये संयुक्त राष्ट्र अमेरिकेतील डि एन्जा कॉलेजच्या प्रो. नीलू गुप्ता, आईसीसीआर हिंदी, वारसा विश्वविद्यालय, पोलंडचे सुधांशु कुमार शुक्ला, सिलिकॉन वैली, संयुक्त राष्ट्र अमेरिकेतील उपेंद्र प्रताप सिंह, हिंदी विश्वविद्यालयातील अकादमिक निदेशक प्रो. अखिलेश कुमार दुबे तथा गांधी व शांती अध्ययन विभागाचे डॉ. मनोज कुमार राय वक्तव्य देतील. स्वागत प्रतिकुलगुरु प्रो. चंद्रकांत रागीट करतील. कार्यक्रमाचे संयोजन प्रवासन, डायस्पोरा अध्यययन विभागाचे सहायक प्रोफेसर डॉ. मुन्नालाल गुप्ता तसेच भाषा विद्यापीठातील सहायक प्रोफेसर डॉ. धनजी प्रसाद करतील.