विदर्भ

त्रुटींची पुर्तता करुन बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य उपलब्ध करुन द्या

कामगार अधिका-यांना खासदार भावनाताई गवळी यांचे निर्देश

यवतमाळ प्रतिनिधी दि २ :- कोरोना संकटाच्या काळात शासनाने बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य करण्याची घोषणा केली होती. त्याअनुषंगाने राज्यासह यवतमाळ जिल्हयातील अनेकांना अर्थसहाय्य प्राप्त झाले आहे. मात्र काही बांधकाम कामगार  त्रुटींची
पुर्तता न केल्याने अजुनही अर्थसहाय्य पासून वंचित आहे. त्यामुळे अशा वंचित बांधकाम कामगारांना त्यांच्या त्रुटींची
पुर्तता करुन त्वरीत अर्थसहाय्य चा लाभ मिळवून देण्याचे निर्देश खासदार भावनाताई गवळी यांनी कामगार अधिका-यांना दिले आहे.
राज्यातील बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात दोन हजार जमा करण्याचा महत्त्वाचा निर्णय उध्दवजी ठाकरे यांच्या सरकारनं घेतला होता. कोरोना संकटाच्या काळात राज्यातील १२ लाख पेक्षाही जास्त बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात २ हजार
रुपये मदतीच्या स्वरूपात सरकारकडून जमा केले जाणार होते. लॉकडाऊनमुळे सर्वच प्रकारची बांधकामे बंद असून, कामगारांवर बेकारीचेसंकट ओढवले आहे. दरम्यान, राज्यातील बांधकाम कामगारांना  भेडसावत असलेल्या अडचणीमध्ये त्यांना आर्थिक साहाय्य देण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,
कामगार मंत्री व संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार मंडळाकडील नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारांना रु. 2000/- एवढे आर्थिक सहाय्य थेट बांधकाम कामगाराच्या बँक खात्यात डीबीटी पद्धतीने जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. इमारत व इतर बांधकाम कामगारांना बांधकामाची परवानगी देताना विकाससकाकडून उपकर वसूल करून मंडळाकडे जमा करण्यात येतो. मंडळाकडे जमा उपकर निधीमधून नोंदीत बांधकाम कामगारांकरिता विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या स्थितीत नोंदीत बांधकाम कामगारांना प्रत्येकी रु. 2000/- प्रमाणे आर्थिक मदत राज्यातील 12 लाखापेक्षा जास्त बांधकाम कामगारांना देण्यात येत आहे. सदरचे आर्थिक सहाय्य नोंदीत बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.  या मजुरांच्या हक्काचा पैसा महाराष्ट्र राज्य बांधकाम मजूर मंडळामध्ये जमा असून, तो नऊ हजार कोटींच्या घरात आहे. बांधकाम व्यावसायिकांकडून सेसच्या रूपात ही रक्कम सरकार जमा करवून घेते. त्यामुळे बांधकाम मजुरांच्या बँक खात्यात पैसे जमा करावेत, असा प्रस्ताव राज्याच्याकामगार विभागाने मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्याकडे दिला होता. शासनाने लाखो बांधकाम मजुरांच्या खात्यात अर्थसहाय्य जमा केले असले तरी यवतमाळ जिल्हयातील अनेक कामगार मात्र काही त्रुटींमुळे या लाभापासून वंचित झाल्याच्या तक्रारी खासदार भावनाताई गवळी यांच्याजनसंपर्क कार्यालयात तसेच शिवसेनेचे यवतमाळ विधानसभा सहसंपर्क प्रमुख संतोष ढवळे, शहर प्रमुख पिंटु बांगर, गुणवंत ठोकळ, राजु नागरगोजे,सुरेश ढेकळे यांच्या कडे प्राप्त  झाल्या आहे. त्यामुळे ज्याकाही अडचणी असतील त्या दुर करुन वंचित कामगारांना  लाभ मिळवून देण्याच्या सुचना खासदार भावनाताई गवळी यांनी दिल्या आहे.

सहानुभूतिपुर्वक विचार करा

कोरोना संकटाच्या काळात बांधकाम मजुर संकटात सापडले आहे. कामे बंद असल्यामुळे त्यांचे परीवार अडचणीत  आहेत.
त्रुटींमुळे अर्थसहाय्य मिळण्यास अडचण झालेल्या कामगारांनी माझ्याकडे आपल्या अडचणी विषद केल्या आहे. संकटाच्या
काळात त्यांच्याबद्दल सहानुभूतीपुर्वक विचार करुन त्यांच्या अडचणी  दुर कराव्या तसेच त्यांना अर्थसहाय्य
मिळवून देण्याचे निर्देश मी कामगार अधिका-यांना दिले आहे.

Back to top button