यवतमाळ दि ११ : महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सशक्त तिसरी ताकद म्हणून उदयास आलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी धनंजय गायकवाड आणि लक्ष्मीकांत लोळगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी यवतमाळ जिह्याचे दोन विभागात विभाजन करून जिल्ह्यात पूर्व आणि पश्चिम अशा दोन अध्यक्षांची नियुक्ती केली आहे. यात लक्ष्मीकांत लोळगे यांची पूर्व तर धनंजय गायकवाड यांची पश्चिमच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या दोहोंनाही पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या व महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या हस्ते बाळासाहेब आंबेडकर यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.
राजकीय बांधणीच्या हिशोबाने वंचित बहुजन आघाडीने यवतमाळ जिल्ह्याची पूर्व आणि पश्चिम अशी विभागणी केली आहे. यात पूर्वमध्ये यवतमाळसह राळेगाव, बाभूळगाव, घाटंजी, केळापूर, मारेगाव, झरी जामणी, वणी यांचा समावेश आहे तर पश्चिम विभागात नेर, दारव्हा,दिग्रस, पुसद, उमरखेड, महागाव, आणि आर्णी तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. पूर्व कार्यकारिणीमध्ये कार्याध्यक्षपदी रणधीर खोब्रागडे, उपाध्यक्षपदी मंगल तेलंग , शैलेश भानवे महासचिवपदी अड्. श्याम खंडारे, सचिवपदी दिलीप बनकर, सचिवपदी दिलीप बनकर कोषाध्यक्षपदी कोशाध्यक्ष अरुण कपिले अॅडव्होकेट विप्लव तेलतुंबडे कायदेशीर सल्लागार शिवदास कांबळे प्रसिद्धीप्रमुख ,सुभाष लसंगे – संघटक ,चिंतामण वाघाडे -सदस्य यांचा समावेश करण्यात आला आहे तर पश्चिम विभागात जिल्हा कार्यकारिणीमध्ये कार्याध्यक्ष प्रमोद राऊत उपाध्यक्षपदी सय्यद जाकीर हुसेन बाबा हुसेन, तात्याराव मानकर, उकंडेश्वर मेश्राम, भाऊराव गायकवाड यांची तर महासचिवपदी प्रशांत विणकरे, दत्तराव दामोदर यांची. कोशाध्यक्षपदी सतीश खाडे, संघटकपदी राजकुमार ताळीकूट, सल्लागारपदी उत्तम पांडे ,कायदेशीर सल्लागारपदी अॅडव्होकेट शंकर मुनेश्वर, प्रसिद्धिप्रमुखपदी विजय लहाने तथा सदस्यपदी किसन राठोड यांची नियुक्ती पूर्ण करण्यात आली आहे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेचे संवर्धन आणि यशस्वीतेसाठी संघर्षरत वंचित बहुजन आघाडीला बहुजन चेहरा देण्याचा बाळासाहेब आंबेडकरांचा प्रयत्न यवतमाळ जिल्ह्याच्या कार्यकारिणीतून संतुलितपणे साधल्या गेल्याच्या प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त होऊ लागल्या आहे.