-
गोरगरिबांच्या घरात दिवाळीत पेटणार दिवे
यवतमाळ दि २- सध्या महाराष्ट्रात व्यवहार सुरळीत होत असताना,हातावर आणून पानावर खाणाऱ्याचे मोठे हाल होत आहे, केंद्र शासनाने पथक विक्रेत्यांचा उदरनिर्वाह सुरळीत चालावा याकरिता पंतप्रधान स्वनिधी योजना आणली, मात्र प्रथम विक्रेत्यांना स्वानिधी योजनेचा लाभ मिळत नसल्याने आज गुरुदेव युवा संघाच्या वतीने यवतमाळ शहरातील बँक ऑफ बडोदा समोर आंदोलन करण्यात आले, यावेळी जोरदार नारेबाजी करून पथविक्रेता महिलांनी रोष व्यक्त केला, बँक व्यवस्थापकाच्या आश्वासनानंतर गुरुदेव युवा संघाने आंदोलन मागे घेतले
टाळेबंदी काळात तीन महिन्यात संपूर्ण कारभार ठप्प होता, त्यातच यवतमाळ शहरातील पथक विक्रेत्यांचे मोठे हाल झाले, केंद्र शासनाने चिल्लर भाजीविक्रेते फळविक्रेते यांकरिता पंतप्रधान आत्मनिर्भर स्वनिधी योजना आणली, पथ विक्रेत्यांनी व्यवसाय सुरळीत करून उदरनिर्वाह करावा केंद्र शासनाचा हा उद्देश स्वनिधी योजनेचा आहे, मात्र यवतमाळ शहरातील बँकेत पथ विक्रेत्यांनी रीतसर अर्ज करूनही शहरातील बँक ऑफ बडोदा चे व्यवस्थापक गोरगरीब पथ विक्रेत्यांना उडवाउडवीचे उत्तर देऊन परत पाठवीत असल्याचा आरोप गुरुदेव संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी केला आहे, आज बँक ऑफ बडोदा समोर योजनेचा लाभ न मिळालेल्या चिल्लर भाजीविक्रेत्या महिलांच्या सोबत गुरुदेव युवा संघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले, यावेळी बँक ऑफ बडोदा चा निषेध असो, असं कसं लोन भेटत नाही घेतल्याशिवाय राहात नाही, अशा जोरदार घोषणा करण्यात आल्या, महिलांनी सुद्धा आपला रोष व्यक्त केला
आंदोलनाची दखल घेत गैरहजर असलेल्या बँक व्यवस्थापक यांना बँकेतील कर्मचारी यांनी माहिती दिली , बँक व्यवस्थापकाने तातडीने बँकेतील कर्मचारी यांना फोन करून गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांच्याशी संवाद साधला, मनोज गेडाम यांनी दिवाळीपूर्वी पथ विक्रेत्यांना स्वनिधी योजनेचा लाभ देण्याची मागणी केली तरच आम्ही आंदोलन मागे घेऊ असे त्यांना सांगितले, यावेळी बँक व्यवस्थापकाने मागणी मान्य केली मागणी मान्य करतात गुरु युवा संघाच्या वतीने केलेले आंदोलन मागे घेण्यात आले,
बँक ऑफ बडोदा येथील बँक व्यवस्थापक सतत गैरहजर राहत आहे, त्यातच अनेक महिलांशी त्यांनी अरेरावीची भाषा वापरली असा आरोप सुद्धा यावेळी गुरुदेवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी केला आहे,,
गोरगरीबांच्या हक्कासाठी लढण्याकरिता आपण गुरुदेव युवा संघाची स्थापना केली,यवतमाळ शहरातील बँक व्यवस्थापक स्वनिधी योजनेचा लाभ पथ विक्रेत्यांना देणार नाही,त्याना त्याची जागा दाखवून देऊ केंद्र शासनाची स्वनिधी योजना ही पथ विक्रेत्यांच्या हक्काची योजना आहे,यवतमाळ जिल्ह्यातील सर्व पथक विक्रेत्यांना गुरुदेव युवा संघाच्या वतीने आपण लाभ मिळवून देऊ