यवतमाळ, दि. 14 : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या व मृत्युचा आकडा वाढतच आहे. गत 24 तासात जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 198 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. तर वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर तसेच कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेले 187 जण ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
मृत झालेल्या नऊ जणांमध्ये यवतमाळ शहरातील 55 वर्षीय पुरुष, यवतमाळ तालुक्यातील 62 वर्षीय पुरुष आणि यवतमाळ येथील 56 वर्षीय पुरुष, वणी शहरातील 53 वर्षीय पुरुष आणि 60 वर्षीय महिला, आर्णि तालुक्यातील 36 वर्षीय पुरुष, महागाव तालुक्यातील 57 वर्षीय पुरुष, दारव्हा तालुक्यातील 23 वर्षीय महिला, दिग्रस तालुक्यातील 43 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 198 जणांमध्ये 113 पुरुष व 85 महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील 19 पुरुष व 15 महिला, उमरखेड शहरातील 11 पुरुष व 11 महिला, वणी शहरातील 23 पुरुष व 17 महिला, आर्णी शहरातील तीन पुरुष व आठ महिला, आर्णी तालुक्यातील एक पुरुष, बाभुळगाव शहरातील 16 पुरुष व चार महिला, दारव्हा शहरातील 12 पुरुष व सहा महिला, दिग्रस शहरातील सहा पुरुष व सहा महिला, दिग्रस तालुक्यातील एक पुरुष, घाटंजी शहरातील चार पुरुष व सहा महिला, कळंब शहरातील एक पुरुष, मारेगाव शहरातील एक पुरुष, नेर शहरातील तीन पुरुष व एक महिला, पांढरकवडा शहरातील दोन पुरुष व तीन महिला, पुसद शहरातील सात पुरुष व चार महिला, राळेगाव शहरातील एक पुरुष, झरी शहरातील दोन पुरूष व चार महिलांचा समावेश आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात 1279 एक्टिव पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये 274 जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 5908 झाली आहे. यापैकी 4195 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 159 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 288 जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत 62345 नमुने पाठविले असून यापैकी 60748 प्राप्त तर 1597 अप्राप्त आहेत. तसेच 54840 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.