पुस्तक आपल्याला प्रेरणा देतात…डॉ. मंदा नांदुरकर

अमरावती/दि २३ – श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित, मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयात, 23 एप्रिल २०२१ ला जागतिक ग्रंथ दिनाचे औचित्य साधून मराठी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “मला आवडलेले पुस्तक”आभासी उपक्रम घेण्यात आला, या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय सहभाग नोंदवला… ”मला आवडलेले पुस्तक ”मध्ये अंजली म्हाला ,कुणाल कमलापुरे,, अर्षद खान, प्राजक्ता, साक्षी दुर्गे, साक्षी बाहेकर ,साक्षी जंजाळकर, वैष्णवी काकडे, नयना सूर्यवंशी, जयश्री शिरभाते या विद्यार्थ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद नोंदवला. मृदगंध, श्यामची आई, सिक्रेट ऑफ लाईफ अशा विविध पुस्तकांवर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांनी त्यांना आवडलेले पुस्तक यावर आपले मत व्यक्त केले . पुस्तके आपल्याला प्रेरणा देतात. आपल्या संग्रही अधिकाधिक पुस्तके असायला हवीत असे मत डॉ मंदा नांदुरकर यांनी व्यक्त केले. प्राचार्य डॉ. छाया विधळे यांच्या मार्गदर्शनात ” *मला आवडलेले पुस्तक* “हा आभासी उपक्रम घेण्यात आला. 23 एप्रिल जागतिक ग्रंथ दिवस, जगप्रसिद्ध नाटक कार विल्यम शेक्सपियर यांचा जन्मदिवस म्हणून पुस्तक दिवस साजरा केल्या जातो.मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयात हा दिवस आभासी माध्यमातून साजरा करण्यात आला.





