मराठी

सीएसपी बँक मित्र या साईडवर सीएसपीच्या नावावर तब्बल १ लाख ३० हजार ६०० रुपयांने गंडविले

वरुड तालुक्यातील उदापूर येथील घटना

वरुड/दि.२७ – सीएसपी बँक मित्र या साईडवर सीएसपीच्या नावावर तब्बल १ लाख ३० हजार ६०० रुपयांने गंडविण्यात आल्याचा प्रकार तालुक्यातील उदापूर येथे घडला. याप्रकरणी सायबर पोलिसांनी ०८४८१०५२७० क्रमांकाच्या मोबाईल वापरकत्र्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी प्राप्त माहीतीनुसार, उदापूर येथील आकाश शंकरराव पाबळे (२३) ह्याने बँक मित्र होण्याकरीता आणि त्याचे ऑनलाईन बिझनेस करण्याच्या उद्देशाने गुगलवर जावुन सीएसपी बँक मित्र या साईडवर सीएसपी करीता फॉर्म अपलोड केला असता त्यातील आरोपी याने आकाशला सीएसपी सेंटरकरीता पैसे भरण्यास सांगितले. त्यानंतर आकाश ह्याने त्यांचे मित्राचे फोन पे व बँक खात्यातून एकूण १ लाख ३० हजार ६०० रुपये ऑनलाईन भरले. आरोपीने आकाशला पुन्हा पैशाची मागणी केली असता त्याची फसवणुक झाल्याचे लक्षात आले.
त्यानंतर आकाशने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी आकाश शंकरराव पाबळे (२३) रा.उदापूर याचे फिर्यादीवरुन सायबर पोलिसांनी ०८४८१०५२७० क्रमांकाच्या मोबाईल वापरकत्र्याविरुध्द भांदंवि ४२०, सहकलम ६६ सी डी.आय.टी.अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Back to top button