मराठी

सोन्याला ११ वर्षांतील नीचांकी मागणी

भारतात तिमाही मागणीत तीस टक्के घट; जगाची मागणी घटली १९ टक्क्यांनी

मुंबई दि २– अमेरिकेत कोरोना विषाणूची साथीची आणि अध्यक्षीय निवडणुकीमुळे जगभरात सोन्याची मागणी 11 वर्षांच्या सर्वात खालच्या पातळीवर आली आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालानुसार सन २०२०-२१ आर्थिक वर्षाच्या दुस-या तिमाहीत सोन्याच्या मागणीत १९ टक्के घट झाली. 30 सप्टेंबर रोजी संपलेल्या तिमाहीत सोन्याची जागतिक मागणी 892 टन होती. तथापि, पुरवठा 1,223.6 टन होता. पुरवठादेखील तीन टक्के कमी झाला. त्याच वेळी, या तिमाहीत भारतातील सोन्याच्या मागणीत 30टक्के घट झाली.
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने आपल्या अहवालात म्हटले आहे, की या तिमाहीत भारतातील दागिन्यांची मागणी कमी होऊन 52२.8 टनांवर आली आहे. गेल्या वर्षी 101.6 टन सोन्याचे दागिने विकले गेले. तथापि, गुंतवणूक म्हणून सोन्याच्या मागणीत 52 टक्क्यांनी वाढ झाली असून ती वार्षिक आधारावर ३३.८ टनांपर्यंत पोहोचली आहे. सोन्याचे दागिने आणि गुंतवणुकीच्या स्वरूपात 30 सप्टेंबर रोजी संपलेल्या तिमाहीत सोन्याच्या मागणीत घट झाली आहे; परंतु मागील तिमाहीपेक्षा मागणी चांगली आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सोन्याचे दागिने आणि गुंतवणुकीच्या रुपात सोन्याच्या मागणीत 70 टक्के घट झाली आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल उद्या म्हणजेच 3 नोव्हेंबर रोजी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागतिक बाजारात सोमवारी सोन्याच्या किंमती खाली आल्या. स्पॉट सोन्याचे भाव प्रति औंस 0.2 टक्क्यांनी घसरून 1,873.87 डॉलर प्रतिआैंसवर आले. त्याच वेळी, अमेरिकत सोन्याच्या वायद्याच्या किंमती 0.03 टक्क्यांनी घसरल्या आहेत आणि कोमेक्सवर १८75 डॉलर प्रति औंस सोन्याचे भाव आहे. अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालाकडे गुंतवणूकदार बारकाईने पाहत आहेत, मीडिया रिपोर्ट्स आणि मतदानपूर्व चाचण्यांत जो बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा आघाडी घेतली आहे. युरोपीय देशांमध्ये कोरोना विषाणूचे प्रमाण वाढले आहे आणि ब-याच देशांनी पुन्हा टाळेबंदी लावण्याची घोषणा केली आहे. या कारणांमुळे सोन्याची मागणी कमी झाली आहे.
कोरोना विषाणूच्या साथीचा धक्का कमी करण्यासाठी आणि सोन्याच्या वाढलेल्या किंमतींचा फायदा घेण्यासाठी जगातील अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी 2010 नंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात सोन्याची विक्री केली आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालानुसार, सप्टेंबर २०२० रोजी संपलेल्या तिमाहीत जगभरातील मध्यवर्ती बँकांनी १२.१ टन सोन्याची विक्री केली. त्या तुलनेत वर्षाच्या १४१..9 टन सोन्याची विक्री झाली. सोन्याची मागणी बरीच कमी राहिली असली, तरी गुंतवणूक म्हणून जगभरात सोन्याच्या मागणीत 21 टक्के वाढ झाली आहे.

  • सोन्याच्या खरेदीपासून दूरच

जेव्हा बाजारामध्ये अनिश्चितता असते, तेव्हा गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करणे सुरक्षित मानतात. कोरोना आणि अमेरिकेच्या निवडणुकीमुळे सोन्याची उच्च किंमत, अर्थव्यवस्थेतील मंदी यामुळे गुंतवणूकदार सोन्याच्या खरेदीपासून दूरच आहेत आणि गेल्या 11 वर्षांत सोन्याची मागणी कमी झाली आहे.

Related Articles

Back to top button