मराठी

शेतकरी सन्मान योजनेत ११० कोटींचा घोटाळा

सरकारच्या सर्वांत मोठ्या योजनेतील घोटाळा

नवी दिल्ली/दि. ९पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM NARENDRA MODI) सरकारच्या सर्वांत मोठ्या योजनेतील घोटाळा उघडकीस आला आहे. जे लोक यासाठी पात्र नव्हते, त्यांनी याचा लाभ घेतला असून ११० कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचे सांगितले जाते. पंतप्रधान शेतकरी सम्मान निधी योजनेत ११० कोटी पेक्षा अधिक रुपयांचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणी चौकशीत ११० कोटींपेक्षा अधिक रुपये ऑनलाइन माध्यमातून काढण्यात आले आहेत. घोटाळ्याचा हा प्रकार तामीळनाडू राज्यात झाला आहे. शेतकèयांच्या लाभासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेतून ११० कोटी रुपये पात्र नसलेल्या लोकांना मिळाले आहेत. या प्रकरणी १८ जणांना अटक करण्यात आली आहे. मुख्य सचिव गगनदीप सिंह बेदी यांना ऑगस्ट महिन्यात प्रथमच या योजनेत अचानक लाभार्थींची संख्या वाढल्याचे दिसले. हा प्रकार १३ जिल्ह्यांत झाला. बेदींनी दिलेल्या माहितीनुसार ज्या १८ जणांना अटक करण्यात आली, ते सर्व एजंट आहेत. या योजनेशी संबंधित ८० अधिकाऱ्याना बडतर्फ करण्यात आले आहे, तर अन्य ३४ अधिकाऱ्याना निलंबित केल्याचे त्यांनी सांगितले. कृषी विभागातील अधिकारी ऑनलाइन अर्ज पद्धतीचा वापर करून बनावट नावे लाभार्थी म्हणून जोडत होते. यात सरकारी अधिकारीदेखील सहभागी होते. जे नवे लाभार्थी होते, ते एजंटना लॉगइन आणि पासवर्ड देत आणि दोन हजार रुपये मिळवून देत असत. चौकट ३२ कोटींची वसुली . सरकारने या घोटाळ्यातील ११० कोटी पैकी ३२ कोटी रुपयांची वसुली केली आहे. तामीळनाडू सरकारने दावा केला आहे, की शिल्लक रक्कम पुढील ४० दिवसात मिळवली जाईल.

Related Articles

Back to top button