पंचायत, महिला बचत गट, सहकारी संस्थांना 138 शिधावाटप दुकाने
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची माहिती
अमरावती, दि.१९ : ग्रामपंचायत, बचत गट, सहकारी संस्था यांना नवीन 138 शिधावाटप दुकाने देण्यात येणार असून, अर्ज मागविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिली.
ग्रामपंचायत, नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, सार्वजनिक संस्था किंवा न्यास या प्राथम्यक्रमानुसार रास्तभाव दुकाने व किरकोळ केरोसिन परवाने मंजूर केलेल्या दुकानांचे व्यवस्थापन महिला किंवा त्यांच्या व्यवस्थापनाद्वारे करणे आवश्यक आहे. यासाठीचे अर्ज चलनाद्वारे शासकीय खजिन्यात 100 रूपये भरून तहसील कार्यालयात मिळतील. अर्ज दि. 21 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर या कालावधीत कार्यालयीन वेळेत स्वीकृत केले जाणार आहेत. याबाबतचा जाहीरनामाही कार्यालयांसहwww.amravati.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे, अशी माहिती श्री. नवाल यांनी दिली.
त्यानुसार अमरावती ग्रामीणमध्ये कुंड सर्जापूर, नांदुरा लष्करपूर, जळका शहापूर, कु-हाड, लोणटेक, जामाडोल, पिंपळविहीर या गावांत, भातकुली तालुक्यात बोकुरखेडा, साऊर, केकतखेडा, चेचरवाडी, मलकापूर, उदापूर, मक्रंदाबाद, कोलटेक, नवथळ, कृष्णापूर, उमरापूर, मक्रमपूर, शिवणी खुर्द, देगुरखेडा, अडवी, खालखोनी, इब्राहिमपूर, सरमसपूर, हिरापूर, ततारपूर, दाऊतपूर या गावांत, तसेच तिवसा तालुक्यात जहागीरपूर, अलवाडा, अहमदाबाद, सुलतानपूर या गावांत शिधावाटप दुकाने देण्यात येत आहेत.
चांदूर रेल्वे तालुक्यात चांदूरवाडी, कोदोरी हरक, चांदूरखेडा, एकलारा (येथे दोन दुकाने), धनोडी, पळसखेड, कोहोळा खानापूर येथे, तर धामणगाव रेल्वे तालुक्यात रामगाव, वकनाथ, विटाळा, उसळगव्हाण, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात शहापूर, जसापूर, चांदसुरा, बोरगाव, पिंप्री पोच्छी, हिवरा मुरादे, शिवरा, वाघोली, अचलपूर तालुक्यात येलकी पूर्णा, गौरखेडा, शहापूर, खैरी, चांदुरा जहागीर, चांदूर बाजार तालुक्यात टोगलापूर, रेडवा, नजरपूर, मिर्झापूर, अब्दुलपूर, मौजखेडा, इनायतपूर, गोविंदपूर, वारोळी, हिरापूर, इमामपूर, जगन्नाथपूर, वरूड तालुक्यात उराड, पळसोना, मुसळखेडा, नागीझरी, हातुर्णा, बेनोडा, लोणी, वरूड, रवाळा, बहादा, खापरखेडा, शेंदुरजनाघाट, रोशनखेडा, डवरगाव, वडाळा, मोर्शी तालुक्यात हाशमपूर, आखतवाडा, ब-हाणपूर, शिरूळ, निंभर्णी, मानिमपूर, पार्डी, तरोडा येथे दुकाने देण्यात येत आहेत.
अंजनगाव सुर्जी तालुक्यात कुंभारगाव, हयापूर, जवळा खु., औरंगपूर, मासमापूर, धनवाडी, वडाळी येथे, तर दर्यापूर तालुक्यात राजखेडा, शहापूर, नांदुरा, अंतरगाव ईटकी, सोनखेडा, इचोदा, चांदूर जहानपूर, रूस्तमपूर, सौंदळी हिरापूर, चंद्रपूर, चिखलदरा तालुक्यात मेमना, भिलखेडा, रामटेक, पांढरा खडक, खटकाली मोठी, कुलंगणा, बिबा, खुटीदा, पस्तलई, मोरगढ, कुही, रायपूर, केशरपूर, भिरोजा, भांदरी, जैतादेही, सोमठाण, खीरपाणी, भुतरूम, रेट्याखेडा पाचडोंग्री, भिलखेडा, झिंगापूर या गावांत, तर, धारणी तालुक्यात रोरा, हरिसाल (दोन), चित्री, मालुर फॉरेस्ट, खोकमार या गावांत नवीन शिधावाटप दुकाने संस्था किंवा गटांना दिले जातील.
-
वनहक्क प्रस्तावांबाबत माहिती प्रसिद्ध
जिल्ह्यात वनहक्कांचे प्राप्त प्रस्ताव vanhakka.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध कऱण्यात आले आहेत. प्राप्त प्रस्तावांवर सर्व नोंदी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यात अपात्र ठरलेल्या प्रस्तावांबाबत हरकती, आक्षेप मागविण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी दिली.
-
कोरोना प्रतिबंधक उपाययोजना
कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली असली तरी साथ अजून संपलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी यावेळी केले. मृत्यूदर कमी करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न होत आहेत. लक्षणे असलेल्यांनीही तत्काळ चाचणी करून घेतल्या पाहिजेत. कुणालाही लक्षणे किंवा तशी शंका असल्यास चाचणी करून घेतलीच पाहिजे. लवकर चाचणी करून घेतली तर उपचार तत्काळ मिळून आजारावर मात करता येणे शक्य होते. लक्षणे असूनही माहिती लपवल्याने नुकसान होऊ शकते, असेही ते म्हणाले.
माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू झाला असून, त्यात आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे दीड लाख गृहभेटी झाल्याचेही त्यांनी सांगितले.