मुंबई/दि.२७ – राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. राज्यात आज सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांत राज्यात सर्वाधिक 14 हजार 718 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 355 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 7 लाख 33 हजार 568 वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत 23 हजार 444 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, 24 तासांत राज्यात 9 हजार 136 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आतापर्यंत राज्यातील एकूण 5 लाख 31 हजार 563 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) सध्या 72.46 टक्के इतके झाले आहे.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 38 लाख 62 हजार 184 नमुन्यांपैकी 7 लाख 33 हजार 568 नमुने पॉझिटिव्ह (18.99 टक्के) आले आहेत. राज्यात 13 लाख 24 हजार 232 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 33 हजार 641 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज 355 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 3.2 टक्के एवढा आहे.
आज निदान झालेले
14,718 नविन रुग्ण आणि नोंद झालेले 355 मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-1350 (30), ठाणे- 238 (12), ठाणे मनपा-183 (1), नवी मुंबई मनपा-405 (11), कल्याण डोंबिवली मनपा-278, उल्हासनगर मनपा-21, भिवंडी निजामपूर मनपा-16 (1), मीरा भाईंदर मनपा-189 (6), पालघर-130 (2), वसई-विरार मनपा-176, रायगड-305 (13), पनवेल मनपा-214 (7), नाशिक-219 (15), नाशिक मनपा-740 (16), मालेगाव मनपा-46 (1), अहमदनगर-347 (4),अहमदनगर मनपा-258 (4), धुळे-72, धुळे मनपा-78 (1), जळगाव- 603 (7), 9जळगाव मनपा-94 (3), नंदूरबार-143 (3), पुणे- 819 (12), पुणे मनपा-1772 (35), पिंपरी चिंचवड मनपा-1085, सोलापूर-251 (14), सोलापूर मनपा-56 (4), सातारा-532 (2), कोल्हापूर-352 (22), कोल्हापूर मनपा-151 (5), सांगली-247 (11), सांगली मिरज कुपवाड मनपा-276 (6), सिंधुदूर्ग-18, रत्नागिरी-64, औरंगाबाद-135 (1),औरंगाबाद मनपा-119 (5), जालना-43 (4), हिंगोली-59 (1), परभणी-48, परभणी मनपा-25, लातूर-85 (2), लातूर मनपा-128 (1), उस्मानाबाद-49 (4),बीड-56 (2), नांदेड-111 (18), नांदेड मनपा-182 (13), अकोला-42 (2), अकोला मनपा-12, अमरावती-45, अमरावती मनपा-86 , यवतमाळ-117 (2), बुलढाणा-67 (2), वाशिम-28, नागपूर-152 (2), नागपूर मनपा-1086 (34), वर्धा-41 (3), भंडारा-39 (4), गोंदिया-65, चंद्रपूर-74, चंद्रपूर मनपा-49, गडचिरोली-25, इतर राज्य 22 (3). चा समावेश आहे.