मराठी

राष्ट्रीय आपत्ती दलाची १६ पथके मदतीसाठी नियुक्त

राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची १६ पथके तैंनात

कोकण/दि. ६ – कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून अतिवृष्टी आहे. या परिस्थितीत नागरिकांना मदत करण्यासाठी राज्य शासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. राज्यातील अतिवृष्टी लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची १६ पथके राज्याच्या विविध भागात तैनात करण्यात आली आहेत. जिल्हा प्रशासन व सर्व आपत्कालीन यंत्रणा सतर्क करण्यात आल्या आहेत. जनतेला घरातच सुरक्षित राहण्याचे आवाहन मदत व पुर्नवसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. .

Back to top button