मराठी

कोरोना लसीचे १६० कोटी डोस

भारत खरेदी करणार

नवी दिल्ली दि ४ – कोरोना विषाणूच्या संसर्गाने ग्रस्त भारतासह जगातील सर्व देश हे कोरोना रोखण्यासाठी लसी खरेदीचे करार करीत आहेत. भारताने 16० कोटी डोस खरेदीचे आदेश दिले आहेत. सर्वाधिक लस खरेदी करणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी म्हणाले, की सुमारे आठ लसीच्या चाचण्या सुरू आहेत. त्यासाठी भारतात लस निर्मितीचे प्रयत्न चालू आहेत. भारतात वेगवेगळ्या टप्प्यात तीन लसी आहेत. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे, की ही लस फारशी दूर नाही. ‘पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने ऑक्सफोर्ड अ‍ॅस्ट्रॅजेनेकाबरोबर करार केला आहे. सीरमने निर्माण केलेली लस प्राधान्याने भारत खरेदी करणार आहे. बहुतेक लस डोस येथे उपलब्ध आहेत. या कराराअंतर्गत अ‍ॅस्ट्रॅजेनेका लसची 50 कोटी डोस भारतात दिले जात आहेत. अमेरिकेने एस्ट्रॅजेनेकासह अन्य कंपन्यांचे एवढेच डोस खरेदीचे करार केले आहेत. भारत आणि अमेरिका व्यतिरिक्त इतर अनेक युरोपीय देशांकडून ऑक्सफोर्ड अ‍ॅस्ट्रॅजेनेका लससाठी सुमारे 40 कोटी डोसच्या ऑर्डर देण्यात आल्या आहेत.
नोव्हावाक्सने कोरोनावरील लस विकसित केली आहे. या कराराखाली भारताने एक अब्ज डोस खरेदीचे आदेश दिले आहेत. भारताने रशियन कोरोना लस स्पुतनिक व्ही च्या दहा कोटी डोससाठी एक करार केला आहे. या लसीची अखेरची चाचणी भारतात सुरू आहे. स्पुतनिक व्हीने हैदराबादच्या डॉ. रेड्डीसोबत चाचणीसाठी करार केला आहे. 11 ऑगस्ट रोजी रशियाने ही लस विकसित केल्याचा दावा केला होता; परंतु आतापर्यंत भारत वगळता इतर कोणत्याही देशाने यासाठी आदेश दिले नाहीत. रशियाच्या गमालय इन्स्टिट्यूटने स्पुटनिक व्ही लस विकसित केली आहे. सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले, की पुढील काही आठवड्यांत लस तयार होईल फायझर-बायोनोटॅक आणि माॅडर्ना या लसी विकसित करणा-या कंपन्यांसाठी भारताने अद्याप कोणतेही आदेश दिले नाहीत. लस पुरविण्यापूर्वी कंपन्यांच्या लसीला जागतिक स्तरावर मान्यता द्यावी लागेल. तरच पुरवठा होईल.

Related Articles

Back to top button