मराठी

राज्यातील 23 अधिका:यांना आयएएस म्हणून पदोन्नती

1995 बॅच मधील अधिका:यांचा समावेश 

मुंबई/३ सप्टेंबर – केंद्र सरकारने राज्यातील २३ अतिरिक्त जिल्हाधिकारी( निवड श्रेणी) यांची नामनिर्देशित निवड केली आहे. यामुळे राज्यातील सनदी अधिका:यांची संख्या वाढली आहे. यात विदर्भातील अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रदीप डांगे यांची निवड झाली आहे.
राज्यातील भारतीय प्रशासन सेवेत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून काही अधिकारी आयएएस अधिकारी म्हणून निवड केली जाते तर काही प्रमाणात राज्य सरकारच्या महसूल सेवेतील अधिका:यांची नियुक्ती केली जाते. त्यानुसार राज्यातील १९९५ च्या तुकडीतील उपजिल्हाधिकारी म्हणून राज्य सरकारच्या सेवेत रुजू झालेल्या अधिका:यांचा यात समावेश असून यात उदय जाधव आणि चिंतामण जोशी या तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सनदी अधिकारी म्हणून निवड झालेल्या अधिकाऱ्यांत उदय जाधव, विजयकुमार फड, कान्हू भगत, भाऊसाहेब डांगडे, किसन जावळे, श्यामसुंदर पाटील, दिलीप स्वामी, संजय चव्हाण, सिद्धाराम सालीमठ, रघुनाथ गावडे, किशोर तावडे, प्रमोद यादव, कविता दिवेदी, सुधाकर तेलंग, मंगेश मोहिते, शिवानंद टाकसाळे, राजेंद्र क्षीरसागर, प्रविण पुरी, विनय मुन, प्रदीप डांगे, वर्षा ठाकूर, डॉ. अनिल रामोद, चिंतामण जोशी यांच्या समावेश आहे.
सदर नामनिर्देशन हे राज्य सरकारमधील सामान्य प्रशासन व महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या लाल फितीमुळे तब्बल अडीच वर्षे उशिरा झाले असून यामुळे वयोमानानुसार श्यामसुंदर पाटील आणि प्रमोद यादव यांना अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून निवृत्त व्हावे लागले. मात्र न्यायालयाच्या निर्णयानुसार यादव आणि पाटील या निवृत्त अधिकाऱ्यांना सनदी अधिकाऱ्यांचे सर्व लाभ देण्याचे निर्देश दिले आहे

Related Articles

Back to top button